Pilot entering emergency transponder code to alert ATC during a hijack or in-flight emergency situation.  esakal
विज्ञान-तंत्र

Hijack Code Used by Pilots: विमान 'हायजॅक' झाल्याचं पायलट ‘ATC’ला नेमकं कोणत्या कोडद्वारे कळवतो?

Aviation Emergency Codes: ‘Mayday’शिवाय विमानात इमर्जन्सीसाठी कोणते-कोणते कोड वापरले जातात?

Mayur Ratnaparkhe

Emergency Codes Used in Aircraft Apart from Mayday: अहमदाबाद प्लेन क्रॅशच्या घटनेनंतर सर्वात जास्त चर्चेत आला तो ‘मेडे’ कॉल. असा काही कॉल असतो आणि त्याचा उपयोग नेमका कशासाठी होतो, हा कॉल कधी केला जातो इत्यादी सर्वप्रकारची माहिती जाणून घेण्याची सर्वसामान्यांमध्ये उत्सुकताही दिसली. शिवाय, मीडियाने याबाबत बरीच बातमीदारी केल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर आता इमर्जन्सीसाठी विमानात मेडे व्यतिरिक्त आणखी कोणते कोड आणि नेमके कशाप्रकारे वापरले जातात, याबाबत आपण माहिती घेवूयात.

'मेडे' (Mayday) कॉल -

कोणत्याही विमानाचा पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला 'मेडे'  तेव्हाच म्हणतो जेव्हा अत्यंत आपत्कालीन परिस्थिती असते, म्हणजेच विमानातील सर्वांच्या जीवाला धोका असतो. उदाहरणार्थ – विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, आग, क्रॅश लँडिंग आवश्यक असल्यास, पायलट तीन वेळा "मेडे मेडे मेडे" म्हणतो. मेडे हा फ्रेंच शब्द 'm’aidez' पासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे - 'मला मदत करा'.

पॅन-पॅन(Pan-Pan) कॉल -

कोणत्याही विमानाचा पायलट तत्काळ मदतीची आवश्यकता असताना एटीसीला पॅन-पॅन कॉल करतो. याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की विमान किंवा त्यातील कोणत्याही प्रवाशाला गंभीर समस्या आहे, परंतु मेडेइतकी गंभीर नाही. म्हणजेच, आपत्कालीन परिस्थिती आहे, परंतु जीवाला तत्काळ धोका नाही. उदाहरणार्थ - वैद्यकीय इमर्जन्सी, नेव्हिगेशन सिस्टममध्ये बिघाड, संप्रेषण बिघाड, लँडिंग गियरमध्ये समस्या असल्यास, पायलट तीन वेळा 'पॅन-पॅन' म्हणतो. पॅन-पॅन हा फ्रेंच शब्द 'panne' पासून वापरला गेला आहे, ज्याचा अर्थ 'ब्रेकडाउन' असा होतो.

स्क्वॉक कोड (Squawk Code) -

'स्क्वॉक कोड' म्हणजे पायलट न बोलता ट्रान्सपॉन्डरद्वारे एटीसीला चार अंकी कोड पाठवतो, जेणेकरून एअर ट्रॅफिक कंट्रोल अधिकाऱ्यांना विमानाची स्थिती समजू शकेल.

विमानात वापरले जाणारे प्रमुख कोड कोणते? –

7500 – या कोडचा अर्थ विमानाचे अपहरण झाल्यास, पायलट हा कोड सेट करतो आणि सांगतो की तो रेडिओवर थेट बोलू शकत नाही.

7600 – या कोडचा अर्थ रेडिओ बिघाड किंवा एटीसीशी रेडिओ संपर्क तुटला असा आहे. अशा परिस्थितीत, एटीसी विमान सुरक्षितपणे उतरवते आणि मानक प्रक्रियांचे पालन करते

7700 – आपत्कालीन परिस्थिती - इंजिनमध्ये बिघाड, आग, नियंत्रण समस्या इत्यादी बाबतीत किंवा पायलटला तात्काळ मदतीची आवश्यकता असल्यास या कोडचा वापर होतो.

'गार्ड फ्रिक्वेन्सी(Guard Frequency)- 121.5 MHz -

इमर्जन्सी फ्रिक्वेन्सी - 121.5 मेगाहर्ट्झ ही एक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, जी सर्व विमानांद्वारे नियंत्रित केली जाते. आपत्कालीन परिस्थितीत, 121.5 मेगाहर्ट्झवर थेट संपर्क साधता येतो. एक प्रकारे, ही 'शेवटची आशा' असणारी फ्रिक्वेन्सी आहे, जेव्हा इतर सर्व संप्रेषण अयशस्वी होतात तेव्हा ती कार्य करते. त्याला 'गार्ड फ्रिक्वेन्सी' असेही म्हणतात. याशिवाय जर एखादं विमान पॅन-पॅन सारख्या आपत्कालीन परिस्थितीत आहे आणि सामान्य एअर ट्राफिक कंट्रोल फ्रीक्वेन्सीवर संपर्क होत नाही, तेव्हा पायलट 121.5 MHzवर संपर्क करतो. जर एखादे कमर्शिअल विमान प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करत असेल तर, सैन्य ते विमान अडवून आधी 121.5 MHzवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते विमानाची ओळख व्हावी.

फ्यूल मेडे(Fuel Mayday) –

पायलट फ्यूल मेडे तेव्हाच म्हणतो जेव्हा, विमानातील इंधन फार कमी झाले असेल किंवा लँडिंगची नितांत आवश्यकता असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT