BSNL
BSNL  google
विज्ञान-तंत्र

BSNLच्या वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी ! हे फायदे होणार कमी...

नमिता धुरी

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अलीकडेच तीन नवीन प्री-पेड प्लॅन लाँच केले आहेत आणि आता कंपनीने आपल्या अनेक प्री-पेड प्लॅन्स एकाच वेळी महाग केले आहेत. टेलिकॉम टॉकने सर्वप्रथम ही माहिती दिली आहे. आता BSNL ने एकाच वेळी आपल्या तीन प्री-पेड प्लॅनमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये कमी केली आहेत.

BSNL च्या ९९ रुपयांच्या प्लॅनचे नवीन फायदे

BSNL च्या 99 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये पूर्वी अमर्यादित कॉलिंगसह 22 दिवसांची वैधता मिळायची पण आता या प्लॅनची ​​वैधता 18 दिवसांची झाली आहे म्हणजेच तुम्ही वैधतेच्या बाबतीत 4 दिवस गमावले आहेत. इतर सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील.

बीएसएनएलचा 118 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 500 MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. आता नवीन बदलामध्ये या प्लानची वैधता 20 दिवसांची झाली आहे, जी पूर्वी 26 दिवसांची होती. सोप्या भाषेत सांगायचे तर, या प्लॅनची ​​किंमत देखील सुमारे 4.53 रुपयांनी वाढली आहे.

BSNL च्या 319 रुपयांच्या प्लॅनचे नवीन फायदे

बीएसएनएलचा 319 रुपयांचा प्लान 75 दिवसांच्या वैधतेसह येत असे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 300 एसएमएस आणि 10 जीबी डेटा उपलब्ध आहे. आता या प्लानची वैधता 65 दिवसांची झाली आहे. म्हणजेच हा प्लॅनही जवळपास 4.25 रुपयांनी महाग झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT