best 6000mah battery smartphone under 13000 rupees check list here  
विज्ञान-तंत्र

6000mAh Battery Phone : परवडणाऱ्या किंमतीत दमदार बॅटरी असलेला फोन शोधताय? 'हे' ऑप्शन्स आहेत बेस्ट

सकाळ डिजिटल टीम

Smartphones with 6000mAh battery Smartphone: स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक ज्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घेतात त्यामध्ये बॅटरी, कॅमेरा, डिस्प्ले, रॅम आणि स्टोरेज हे फीचर्स सर्वात महत्त्वाची आहेत. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना नवीन फोन घेताना मोठी बॅटरी हवी आहे जेणेकरून हँडसेट पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागू नये, तर आज आपण अशा टॉप-3 फोनबद्दल जाणून घेणार आहोत.

Redmi 9 Power : किंमत 12,990 रुपये

रेडमी 9 पॉवर Amazon वर 12,990 रुपयांना लिस्टेड आहे. हा फोन 12,150 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरमध्ये घेतला जाऊ शकतो. 2,165 रुपयांच्या नो कॉंस्ट EMI वर हँडसेट घेण्याची संधी आहे.

रेडमी 9 पॉवर स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी, 6000mAh बॅटरी उपलब्ध आहे. Redmi च्या या फोनमध्ये 6.53 इंच फुलएचडी+ डिस्प्ले आहे. फोनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 48-मेगापिक्सेल प्राइमरी रियर सेन्सरसह कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. रेडमी 9 पॉवरमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M13: किंमत 10,499 रुपये

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन Amazon वर 10,499 रुपयांना लिस्ट झाला आहे. हा स्मार्टफोन SBI बँकेच्या क्रेडिट कार्डने 1000 रुपयांच्या इंस्टंट सवलतीत घेता येईल. फोनवर 9,550 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. हा सॅमसंग फोन 1,750 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेता येईल.

Samsung Galaxy M13 मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ एलसीडी इन्फिनिटी ओ डिस्प्ले आहे. स्क्रीनची घनता 401 PPI आहे. स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी, 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे तीन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Realme narzo 50A: किंमत 12,499 रुपये

Realme Narzo 50A स्मार्टफोन Amazon India वर 12,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. Amazon वरून फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील मिळेल. SBI क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. फोनवर 11,800 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. 2083 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर हँडसेट घेण्याचीही संधी आहे.

Realme Narzo 50A स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर उपलब्ध आहे. या बजेट फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल प्राइमरी रिअर कॅमेरा, 2-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल सेन्सर्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT