Electric Scooter Sakal
विज्ञान-तंत्र

Cheapest Electric Scooter : महागड्या EV ला टक्कर; या आहेत बजेट EV स्कूटर्स

तुम्हीदेखील इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर, हे पाच पर्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Cheapest Electric Scooter : वाढत्या इंधनाच्या दरांमुळे अनेकजणांचा कल इलेक्ट्रिक गाडी घेण्याकडे आहे. तुम्हीदेखील इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर, आज आम्हा तुम्हाला पाच अशा गाड्यांबाबत सांगणार आहोत. ज्या तुमच्या अगदी बजेटमध्ये आहेत.

जर तुमचे बजेट 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर, तुम्ही कोमाकी, बाउन्स, एव्हॉन, ई-बोल्ट डर्बी आणि रफ्तार या ई-स्कूटर्सचा विचार करू शकता. जरी या गाड्यांच्या किमती कमी असल्या तरी, या गाड्या महागड्या ई-व्ही गाड्यांच्या तोडीस तोड अशाच आहेत.

Bounce Infinity E1

भारतीय कंपनी बाउंसची इलेक्ट्रिक स्कूटर या बजेट रेंजमध्ये एक उत्तम पर्याय असू शकते. कंपनीच्या Bounce Infinity E1 ई-स्कूटरची किंमत सुमारे 45,099 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. यात स्वॅप करण्यायोग्य बॅटरी फीचर देण्यात आले आहे. या गाडीचा टॉप स्पीड 65 किमी प्रतितास आहे.

Komaki X1

कमी बजेट ईव्ही गाडीमध्ये तुम्ही Komaki या गाडीचाही विचार करू शकता. Komaki XGT KM इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत केवळ 42,500 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. तर, Komaki X1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 45,000 रुपयांपासून सुरू होते. दोन्ही ई-स्कूटर्सचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास असल्याचा दावा करण्यात आला आहे.

electric bike

Raftaar Electrica

जर तुम्हाला इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये कमी बजेट आणि हाय रेंज असा पर्याय तुम्ही शोधत असाल तर, Raftaar कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर हा एक चांगला पर्याय असू शकतो. Raftaar Electrica च्या गाड्यांच्या किमती 50,000 रुपयांच्या आत असून, या गाड्यांची सुरूवात 48,540 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे फुल बॅटरी चार्ज केल्यानंतर ही गाडी 100 किमी प्रति तास चालते. या गाडीमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटन स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म यासह अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

Crayon

कमी बजेटच्या ई स्कूटरमध्ये Crayon Zeez गाडीचाही समावेश आहे. या गाड्यांची सुरूवात 48,000 रुपयांपासून सुरू होते. या गाडीत 250W बॅटरीसह देण्यात आली असून, याचा स्पीड 25 किमी प्रतितास आहे.

cheaper ola electric scooter

Avon E-SCOOT 504

वरील गाड्यांसह तुम्ही बजेट ई स्कूटरसाठी Avon कंपनीच्या E-SCOOT 504 चादेखील विचार करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे 45,000 रुपये आहे. फुल चार्ज केल्यानंतर ही गाडी साधारण 65 किमी पर्यंत धावू शकते. याचा टॉप स्पीड 24 किमी प्रतितास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Golden Kalash : लाल किल्ल्यातून 1 कोटींचा सोने-हिऱ्यांनी जडलेला कलश चोरीला; घटना सीसीटीव्हीत कैद, जैन समाजाच्या कार्यक्रमात प्रकार

मानाच्या गणपतीच्या आरतीवरून वाद, ठाकरेंच्या नेत्याकडून शिंदेंच्या मंत्र्याचा पानउतारा, मग सत्कारात मागे ठेवून लागलीच घेतला बदला

काय नवरा एक्सचेंज ऑफर सुरुये? 'घरोघरी मातीच्या चुली'चा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- हिला सगळ्या भावांशी लग्न करायचंय...

Latest Maharashtra News Updates : विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात विदर्भातील ओबीसी संघटनांची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT