Best Gaming Phones in 2024 Under ₹20,000 esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone 2024 : गेमर्ससाठी खुशखबर! 20,000 पेक्षा कमी बजेटमध्ये धमाकेदार गेमिंग फोन

Gaming Smartphones : आता ₹20,000 पेक्षा कमी बजेटमध्येही तुम्ही टॉप-परफॉर्मन्स गेमिंग फोन घरी घेऊ शकता. या किंमतीच्या रेंजमध्ये अनेक शानदार पर्याय उपलब्ध आहेत.

Saisimran Ghashi

Budget Smartphone : गेमर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे. आता ₹20,000 पेक्षा कमी बजेटमध्येही तुम्ही टॉप-परफॉर्मन्स गेमिंग फोन घरी घेऊ शकता. या किंमतीच्या रेंजमध्ये अनेक शानदार पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या जबरदस्त गेमिंग फोन्सबद्दल...

१) पोको एक्स6: गेमिंगसाठीचा एक उत्तम पर्याय म्हणजे पोको एक्स6. या फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेस देतो. गेम खेळताना फोन ग गरम होऊ नये म्हणून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन आहे. Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आणि Adreno 710 GPU सह, हा फोन गेमिंगसाठी चांगला पर्याय ठरतो.

२) iQOO Z9 5G: MediaTek Dimensity 7200 चिपसेट आणि Mali-G610 GPU सह, iQOO Z9 5G गेमिंगसाठी उत्तम कार्यप्रदर्शन देते. 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.67-इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले गेमिंगचा अनुभव आणखी चांगला करतो. 50MP सोनी IMX882 प्राइमरी सेन्सर असलेल्या कॅमेरामुळे फोटो आणि व्हिडिओची गुणवत्ताही उत्तम आहे.

३) रियलमी पी1 5G: फक्त ₹15,999 (6GB रॅम) इतक्या किंमतीमध्ये मिळणारा हा फोन गेमर्ससाठी आकर्षक पर्याय आहे. 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट असलेला 6.67 इंचाचा डिस्प्ले गेम खेळण्यासाठी उत्तम आहे. MediaTek Dimensity 7050 SoC आणि Mali-G68 MC4 GPU चांगले परफॉर्मन्स देतात.

४) रेडमी नोट 13: रेडमीचा हा फोनही गेमिंगसाठी चांगला पर्याय आहे. MediaTek Dimensity 6080 चिपसेट आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले गेमिंगसाठी उत्तम आहे. 108MP प्राइमरी सेन्सर असलेल्या कॅमेरामुळे फोटोची गुणवत्ताही चांगली आहे.

५) वनप्लस नॉर्ड सीई 3: स्नॅपड्रॅगन 782G चिपसेट आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7 इंचाचा फ्लुइड AMOLED डिस्प्ले असलेला हा फोन गेमिंगसाठी आकर्षक आहे. 50MP सोनी IMX890 सेन्सर असलेल्या कॅमेऱ्यामुळे फोटो सुद्धा चांगले येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT