Range Rover Sport Sakal
विज्ञान-तंत्र

Best Car 2023: नवीन गाडीसह साजरे करा २०२३ वर्ष, टॉप क्लास फीचर्ससह येतेय 'ही' कार; पाहा किंमत

रेंज रोव्हरने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपल्या Range Rover Sport या ५ सीटर एसयूव्हींना भारतीय बाजारात लाँच केले आहे. या एसयूव्हीची आता विक्री सुरू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Range Rover Sport Features: रेंज रोव्हरने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपल्या Range Rover Sport या ५ सीटर एसयूव्हींना भारतीय बाजारात लाँच केले आहे. या एसयूव्हीची आता विक्री सुरू झाली आहे. कारची सुरुवाती किंमत जवळपास १.६४ कोटी रुपये आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या एसयूव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊया.(Best Car for 2023)

नवीन रेंज रोव्‍हर स्‍पोर्टमध्‍ये मागील बाजूला प्रवाशांना बसण्यासाठी भरपूर जागा देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास करताना आरामदायी अनुभव मिळतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी १३.१ इंच फ्लोटिंग पीव्ही प्रो हॅप्टिक टचस्क्रीन आणि १३.७ इंच इंटरअ‍ॅक्टिव्ह ड्राइव्हर डिस्प्ले दिला आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Range Rover Sport

एसयूव्ही ३.० लीटर डिझेल आणि ३.० लीटर पेट्रोल इंजिनसह येते. डिझेल इंजिन २५८ केडब्ल्यू पॉवर आणि ७०० एनएम टॉर्कची निर्मिती करते. तर पेट्रोल इंजिन २९४ केडब्ल्यू पॉवर आणि ५५० एनएम टॉर्क जनरेट करते.

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले, 'नवीन रेंज रोव्‍हर स्‍पोर्ट सतरा वर्षांच्‍या अद्वितीय स्‍पोर्टिंग लक्‍झरीवर निर्माण करण्‍यात आली आहे. हे थर्ड-जनरेशन मॉडेल अनेक चांगल्या फीचर्ससह येते.'

रेंज रोव्हर स्पोर्टमध्ये लहान ओव्हरहँग्स, मोठे व्हील्स, प्री-एम्प्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन, इलेक्‍ट्रॉनिक अ‍ॅक्टिव्‍ह डिफरेन्शियलसह टॉर्क वेक्‍टरिंग बाय ब्रेकिंग आणि अ‍ॅडप्टिव्‍ह ऑफ-रोड क्रूझ कंट्रोल सारखे शानदार फीचर्स देखील मिळतील. यात देण्यात आलेल्या हॅप्टिक टचस्क्रीनद्वारे तुम्हाला अनेक फीचर्स एकाच ठिकाणी मिळतील. नेव्हिगेशनपासून ते व्हीकल सेटिंग्जपर्यंत अनेक गोष्टी सहज करणे शक्य होईल.

कारच्या किंमतीबद्दल सांगायचे तर नवीन Range Rover Sport ची किंमत १.६४ कोटी रुपये (एक्स-शोरुम) आहे. दमदार फीचर्सबद्दल सांगायचे तर या ५-सीटर एसयूव्हीची विक्री सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT