OTT Apps Sakal
विज्ञान-तंत्र

OTT App: Netflix-Hotstar साठी पैसे खर्च करण्याची गरजच नाही, 'या' अ‍ॅपवर मोफत पाहू शकता चित्रपट-सीरिज

नेटफ्लिक्स, हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला दरमहिन्याला शेकडो रुपये खर्च करण्याची गरज नाही. काही असे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यावर तुम्ही मोफत चित्रपट-सीरिज पाहू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Free OTT Apps: गेल्याकाही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. असंख्य ओटीटी प्लॅटफॉर्म्स सध्या उपलब्ध झाले आहेत. Disney+ Hotstar, Amazon Prime Video, Voot, Netflix, ZEE5 आणि Jio Cinema सारखे असंख्य प्लॅटफॉर्म्स यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्म्ससाठी तुम्हाला महिन्याला शेकडो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, एक असे अ‍ॅप आहे ज्यावर तुम्ही मोफत चित्रपट-सीरिजचा आनंद घेऊ शकता. हे अ‍ॅप अँड्राइड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

Sugarbox ला मोफत करू शकता डाउनलोड

या फ्री अ‍ॅपचे नाव Sugarbox आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून Sugarbox ला डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर मोबाइल इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करा. तसेच, Sugarbox अ‍ॅपची वाय-फाय कनेक्टिव्हिटी देखील बंद करा. तुम्ही हाय-क्वालिटी चित्रपट आणि सीरिज डाउनलोड करून ऑफलाइन याचा आनंद घेऊ शकता.

Sugarbox हे एक हायपरलोकल एड्ज क्लाउड टेक्नोलॉजी सॉल्यूशन अ‍ॅप्लिकेशन आहे. जेथे वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्क नाही अशा ठिकाणीही SugarBox अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मोफत पाहता येईल चित्रपट-सीरिज

SugarBox अ‍ॅपद्वारे तुम्ही मोफत वेगवेगळ्या सुविधांचा फायदा घेऊ शकता. तसेच, शॉपिंग आणि ऑनलाइन प्रोडक्ट डिलिव्हरची देखील सुविधा मिळते. अ‍ॅपवर तुम्ही चित्रपट आणि वेब सीरिजला डाउनलोड करता येईल. एवढेच नाही तर याद्वारे गेम देखील खेळू शकता. इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जे चित्रपट, सीरिज पैसे देऊन पाहावे लागतात; ते तुम्ही SugarBox वर मोफत पाहू शकता.

हेही वाचा: Wrong Fuel In Bike: गाडीत पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT