Tata Altroz Google
विज्ञान-तंत्र

बजेटमध्ये कार शोधताय? जाणून घ्या प्रीमियम हॅचबॅक कारचे बेस्ट ऑप्शन

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाला तर सध्या बाजारात अनेक प्रकारच्या कार उपलब्ध आहेत. प्रत्येक कारमध्ये मिळणारे फीचर्स हे त्याच्या किंमतीवर आधारित असतात. जर तुमचे बजेट 10 लाखांपर्यंतच्या प्रीमियम हॅचबॅक कार घेण्याचे असेल, तर बाजारात अनेक चांगल्या कार आहेत ज्यांचा तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला हा निर्णय घेताना सोपे व्हावे म्हणून आज आपण काही बेस्ट ऑप्शन्सबद्दल चर्चा करणार आहेत.

मारुती बलेनो

तुम्ही मारुती सुझुकीची प्रीमियम हॅचबॅक मारुती सुझुकी बलेनो कार खरेदी करू शकता. देशात या कारला जबरदस्त मागणी आहे. या कारची किंमत 5.99 लाख रुपये असून त्याचे टॉप व्हेरिएंट Alpha Automatic घेऊ शकता, ज्याची एक्स-शोरूम किंमत 9,45,000 रुपये आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन तसेच सुरक्षेसाठी दोन एअरबॅगही देण्यात आल्या असून कारमध्ये तुम्हाला असे अनेक दमदार फीचर्स मिळतील.

ह्युंदाई i20

Hyundai ची प्रीमियम हॅचबॅक Hyundai i20 कार भारतात खूप लोकप्रिय आहे. हा देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. या गाडीची किंमत 691,200 लाख रुपयांपासून सुरू होते, परंतु त्याचा टॉप व्हेरिएंट (1.5 l U2 CRDi डिझेल 6-स्पीड मॅन्युअल 1.5 DSL Asta (O) DT) तुम्ही 10,76,800 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यात 1.5 लिटर डिझेल इंजिनचा ऑप्शन दिला आहे.

टाटा अल्ट्रोझ

Tata Motorsची Tata Altroz ​​ही प्रीमियम हॅचबॅक देखील चांगला ऑप्शन आहे, या कारची किंमत 5.90 लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 9.65 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीने नुकतेच तिचे डार्क एडिशन देखील लॉंच केले आहे, ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन दिले आहे.

टोयोटा ग्लान्झा

तुम्ही टोयोटाची प्रीमियम हॅचबॅक कार टोयोटा ग्लान्झा देखील विचारात घेऊ शकता. त्याची किंमत 7,49,000 रुपये असून याचे टॉप 9,45,000 रुपयांपर्यंत खरेदी करता येते. यात 1.2 लिटर (1197 cc) पेट्रोल इंजिन दिले असून यात तुम्हाला चांगले सेफ्टी फीचर्स देखील मिळतील.

फोक्सवॅगन पोलो

फोक्सवॅगनची प्रीमियम हॅचबॅक कार फोक्सवॅगन पोलो हा देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही ही कार 6,32,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपय आहे. यामध्ये तुम्हाला 1.0L MPI आणि 1.0L TSI इंजिन ऑप्शन्स मिळतात. या कारचे डिझाइन, फीचर्स आणि परफॉर्मन्स दमदार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT