best prepaid plans with unlimited calling and data under rs 200 from jio airtel vodafone idea 
विज्ञान-तंत्र

आता 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत करा रिचार्ज; जाणून घ्या Jio, Airtel चे भन्नाट प्लॅन

शर्वरी जोशी

मोबाईल फोन हा सध्याच्या काळात जीवनावश्यक वस्तू झाली आहे. आजकाल लहान मुलांच्या हातातदेखील मोबाईल फोन्स पाहायला मिळतात. काळानुरुप आता मोबाईल फोनचं रुपडंदेखील पालटलं आहे. त्यामुळे साध्या मॉडेलपासून सुरु झालेल्या फोनचा प्रवास आता एन्ड्रॉइड, स्मार्टफोन इथपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे केवळ फोनचं नाही तर अनेक मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांसाठी काही खास रिचार्जचेदेखील प्लॅन बाजारात आणले आहेत.  यात असे काही प्री-पेड प्लॅन आहेत जे केवळ 200 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहेत. यात Jio, Airtel आणि Vi या कंपन्यांनी ग्राहकांसाठी आणलेले खास प्लॅन कोणते ते पाहुयात.

Airtel चा 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन -

Airtel चा 149 रुपयांचा प्री-पेड प्लॅन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या प्लॅनमधअये 2 GB डाटा असून हा प्लॅन 28 दिवसांचा आहे. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंगचीदेखील सुविधा आहे. तर 300 SMS फ्री आहेत. विशेष म्हणजे या प्लॅनअंतर्गत 30 दिवसांसाठी फ्री अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचीदेखील फ्री सर्व्हिस मिळेल.

 Jio चा भन्नाट प्लॅन -

जिओने ग्राहकांसाठी 149 चा  एक नवा प्लॅन आणला आहे. 24 दिवसांचा असलेल्या या प्लॅनमध्ये 1 जीबी डाटा, 100 SMS फ्रीमध्ये मिळणार आहेत. तसंच जिओच्या सगळ्या अॅप्ससाठीचं सबस्क्रिप्शनदेखील मिळेल. तर दुसरा प्लॅन आहे 199 रुपयांचा. या प्लॅनमध्ये 1.5 GB डाटा, अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा असून हा प्लॅन 28 दिवसांचा आहे.

Vi चा 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन -

व्होडाफोन, आयडियाकडे 148 रुपयांचा प्लॅन आहे. यात 1 जीबी डाटा, दररोज 100 मेसेज आणि अनलिमिडेट कॉलिंग फ्री आहे.  हा 18 दिवसांचा असलेला आहे. तर दुसरा प्लॅन 149 रुपयांचा आहे. यात 3 जीबी डाटा, अनलिमिडेट कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहेत. तसंच 28 दिवसांची याची वैधता आहे. विशेष म्हणजे Vi चा तिसरा प्लॅनदेखील आहे. हा प्लॅन 199 रुपयांचा आहे. ज्यात 24 दिवस दररोज 1 GB जीबी डाटा, अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 SMS एसएमएस मिळणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal Election : काँग्रेसची मते वाढली, भाजपचा हिट रेशो वाढला; महापालिकेचं राजकीय गणित उघड

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यता

Gastrointestinal Cancer : वारंवार पोट दुखतंय? मग, याकडे अजिबात दुर्लक्ष नको; असू शकते कॅन्सरची सुरुवात...

Sugarcane Trolley Overturned : वाणेवाडीत ट्रॉलीभर ऊस अंगावर पडूनही बाप-लेक सुखरूप

Nashik Farmers Protest : वनहक्कासाठी आदिवासींचा एल्गार; नाशिक-गुजरात महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ठप्प!

SCROLL FOR NEXT