विज्ञान-तंत्र

BGMI : गेमर्ससाठी खुशखबर! बॅटलग्राऊंड्स मोबाईल गेम येणार परत; असे असतील बदल

भारत सरकारने गेल्या वर्षी या गेमवर बंदी लागू केली होती.

Sudesh

तुम्ही जर मोबाईल गेम्सचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीजीएमआय ही प्रसिद्ध गेम आता परत येणार आहे. भारत सरकारने गेल्या वर्षी या गेमवर बंदी लागू केली होती. मात्र, येत्या काही दिवसांमध्येच ही गेम पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे.

पाळावे लागणार नियम

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ही गेम केवळ तीन महिन्यांसाठी पुन्हा उपलब्ध असणार आहे. या तीन महिन्यांमध्ये सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन गेम कंपनीला करावे लागणार आहे. तीन महिने देखरेख केल्यानंतर पुढे या गेमला भारतात परवानगी द्यायची की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. न्यूज१८ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गेममध्ये होणार हे बदल

या गेममध्ये प्लेयर्सच्या सेफ्टीसाठी काही बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये आता रक्त दाखवण्यासाठी लाल ऐवजी हिरवा रंग वापरण्यात येणार आहे. यापूर्वी गेममधील रक्ताचा रंग लाल किंवा हिरवा ठेवण्याचा पर्याय यूझर्सना देण्यात आला होता. आता मात्र तो हिरवाच असणार आहे.

यासोबतच, गेम खेळण्याच्या वेळेवरही निर्बंध लादण्यात येऊ शकतात. भरपूर वेळ खेळल्यानंतर यूझर्सना एक तासाचा कम्पल्सरी ब्रेक घ्यावा लागणार आहे.

पब्जीला माफी नाही

बीजीएमआय म्हणजेच बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया ही गेम पब्जी या गेमच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती. PUBG ही चिनी गेम बॅन झाल्यानंतर भारतातील गेमिंग नियमांना लक्षात घेत BGMI तयार करण्यात आली होती. मात्र, ही गेम क्राफ्टॉन या दक्षिण कोरियातील कंपनीने तयार केली आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या कारणास्तव या गेमवर बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, याबाबत क्राफ्टॉनकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही गेम पुन्हा आपल्या भेटीला येण्याची शक्यता रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात येत आहे. बॅन होण्यापूर्वी या गेमचे भारतात सुमारे १०० मिलियन यूझर्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT