big discount on nothing phone 1 opportunity to buy just rs 15499 on flipkart  
विज्ञान-तंत्र

Nothing Phone 1: स्वस्तात खरेदी करा नथिंग फोन 1; मिळतोय बंपर डिस्काउंट

सकाळ डिजिटल टीम

नथिंग फोन 1 (Nothing Phone 1) यावर्षी 12 जुलै रोजी लॉन्च झाला आहे. फोनची किंमत 32,999 रुपयांपासून सुरू होते. मात्र, आता फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली असून, लॉन्च झाल्यापासून एका महिन्यातच नथिंग फोन 1 ची किंमत एक हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

या फोनची किंमत 37,999 रुपयांपासून सुरू होते, परंतु नथिंग फोन 1 वर ई-कॉमर्स साइट्सवर मोठी सूट मिळत आहे. डिस्काउंटसह, फोन फक्त 15,499 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

नथिंग फोन 1 वर ऑफर

नथिंग फोन 1 ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरू होते, या किंमतीत तुम्हाला 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. तथापि, हा फोन फ्लिपकार्टवर 13 टक्के सवलतीसह 32,999 रुपयांच्या किमतीत लिस्टेड आहे. त्याच वेळी, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर

2,167 रुपयांच्या EMI वर देखील फोन खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर फोनसोबत एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्ही 17,500 रुपयांपर्यंत बचत करू शकता. म्हणजेच हा फोन सर्व बेनिफीट्स लक्षात घेता 15,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

स्पेसिफीकेशन्स काय आहेत?

नथिंग फोन 1 मध्ये Android 12 उपलब्ध आहे. त्याच वेळी, फोनमध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेसह HDR10+ साठी सपोर्ट आहे आणि ब्राइटनेस 1200 nits आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर असून 12 GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळते.

नथिंग फोन 1 मध्ये ड्युअल रियर कॅमेरे दिले आहेत, एक लेन्स 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX766 सेन्सर आहे आणि ती OIS आणि EIS दोन्हीला सपोर्ट करते. दुसरी लेन्स 50-मेगापिक्सेलचा सॅमसंग JN1 सेन्सर देखील आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल आहे. फ्रंटला 16-मेगापिक्सलचा Sony IMX471 कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, फोनला 4500mAh बॅटरी मिळते, ज्यासह 33W वायर चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंगसह 15W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : महायुतीला मोठं यश मिळण्याची शक्यता, भाजपला टॉप स्थान – मंत्री अतुल सावे

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT