Blackberry Phones 
विज्ञान-तंत्र

एका युगाचा अंत! आजपासून BlackBerry फोन होणार बंद

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनबद्दल (Smartphones) बोलायचे झाल्यास जवळपास दशकभरापूर्वी बाजारात एक फोन आला होता, ज्याला लोक स्टेटस सिम्बॉल म्हणून बघायचे. .हे फोन ब्लॅकबेरी (BalckBerry) कंपनीचे होते, हा फोन पाहून तुम्हाला देखील तो विकत घ्यावा, असे वाटले असेल, आजही तुमच्याकडे ब्लॅकबेरी फोन असेल, तर त्या फोनला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली आहे. कारण ब्लॅकबेरी आजपासून अधिकृतपणे काम करणे बंद करेल.

जगभरात Qwerty Keypad लोकप्रिय करणारे फोन आता यापुढे काम करणार नाहीत. 4 जानेवारीपासून, स्मार्टफोन सेवा देण्यात येणार नाहीत, म्हणजेच डिव्हाइसेसवर वायफाय कनेक्शन, डेटा, फोन कॉल्स, एसएमएस किंवा इमर्जेंसी कॉल करता येणार नाहीत

ब्लॅकबेरीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगीतले की, ब्लॅकबेरी फोनची सेवा 4 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून बंद करण्यात येईल. कंपनीने सांगितले की, BlackBerry 7.1 OS आणि त्यापूर्वीच्या, BlackBerry 10 सॉफ्टवेअर, BlackBerry PlayBook OS 2.1 आणि पूर्वीच्या व्हर्जन्ससाठी सेवा 4 जानेवारी 2022 नंतर बंंद होईल. वाय-फाय कनेक्‍शन द्वारे या सर्विसेस आणि सॉफ्टवेअर चालवणारी डिव्हाइसेस यापुढे डेटा, फोन कॉल, SMS आणि इमर्जंनसी क्रमांकांसाठी काम करणे बंद करतील.

कंपनीने गुरुवारी अधिकृतपणे जाहीर केले की ते यापुढे ब्लॅकबेरी OS, 7.1 OS, PlayBook OS 2.1 सीरीज आणि Blackberry 10 वर चालणार्‍या स्मार्टफोन्सना सपोर्ट देणार नाहीत, त्यामुळे ग्राहक यापुढे हे स्मार्टफोन चालवू शकणार नाहीत आणि ते आता फक्त एक शोभेची वस्तू म्हणूनच राहतील. आता हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या कोणत्याही यूजर्सला याचे अपडेट दिले जाणार नाही. 4 जानेवारीपासून कंपनी या स्मार्टफोन्सवरून आपला सपोर्ट काढून घेईल आणि नंतर त्यांचा काही उपयोग होणार नाही. मात्र, जे वापरकर्ते कंपनीचे अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत आहेत त्यांना त्यांना सपोर्ट दिला जाईल.

सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका ब्लॉगमध्ये, ब्लॅकबेरीचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ जॉन चेन यांनी घोषणा केली होती की, कंपनी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये बदलले आहे. तसेच ही सेवा बंद केल्याने ब्लॅकबेरी लिंक, ब्लॅकबेरी डेस्कटॉप मॅनेजर, ब्लॅकबेरी ब्लेंड, ब्लॅकबेरी प्रोटेक्ट यासह ब्लॅकबेरी होस्ट केलेल्या ईमेल एड्रेसवर परिणाम होईल.

जर तुम्ही तुमच्या ब्लॅकबेरी फोनमध्ये साठवलेल्या डेटाबद्दल काळजी करत असाल, तर कंपनीने त्यासाठी सांगीतले की, ब्लॅकबेरीची ओळख पटवण्यासाठी कंपनी आवश्यक असेल तोपर्यंत वैयक्तिक माहिती राखून ठेवते, जेव्हा माहिती आवश्यक किंवा संबंधित राहत नाही, तेव्हा BlackBerry वापरकर्त्याचा डेटा डिलीट केला जातो. तुम्ही कंपनीला privacyoffice@blackberry.com वर डेटा डिलीट करण्याची विनंती देखील पाठवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT