boAt Wave Electra Sakal
विज्ञान-तंत्र

Smartwatch Offer: boAt च्या स्वस्त स्मार्टवॉचची विक्री सुरू, कॉलिंग सपोर्टसह मिळेल शानदार फीचर्स; किंमत खूपच कमी

काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच झालेल्या boAt Wave Electra स्मार्टवॉचची विक्री आजपासून सुरू झाली आहे. या वॉचची किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

boAt Wave Electra available for sale: boAt ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपली नवीन स्मार्टवॉच boAt Wave Electra ला लाँच केले आहे. या स्मार्टवॉचची आता विक्री सुरू झाली आहे. २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या वॉचमध्ये १.९१ इंच डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट मिळेल. दमदार फीचर्ससह boAt Wave Electra च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

boAt Wave Electra ची किंमत आणि उपलब्धता

boAt Wave Electra स्मार्टवॉचला कंपनीने फक्त १,७९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. या वॉचला तुम्ही boAt-lifestyle.com आणि ई-कॉमर्स साइट Amazon वरून खरेदी करू शकता.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

boAt Wave Electra चे स्पेसिफिकेशन्स

boAt Wave Electra स्मार्टवॉचमध्ये १.८१ इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला असून, याची पीक ब्राइटनेस ५५० निट्स आहे. पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. वॉचला हाय-क्वालिटी अ‍ॅल्यूमिनियम मिक्स मेटलद्वारे तयार करण्यात आले आहे.

वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेंसर, स्लीप ट्रॅकर, डेली अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि वॉटर अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत.

boAt च्या वॉचमध्ये कॉलिंगचा देखील सपोर्ट दिला आहे. यामुळे तुम्हाला कॉलिंगसाठी फोनची गरज नाही. कॉलिंगसाठी वॉचमध्ये बिल्ट-इन स्पीकर, मायक्रोफोन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळेल. यूजर्स या वॉचमध्ये ५० कॉन्टॅक्ट्स सेव्ह करू शकता. कॉलला क्विक अ‍ॅक्सेस करण्यासाठी एक डायल पॅड देखील आहे.

या वॉचमध्ये सिरी आणि गुगल वॉइस असिस्टेंटचा देखील सपोर्ट दिला आहे. याशिवाय, वॉचमध्ये 2048 आणि व्हॅक-ए-मोल सारख्या दोन बिल्ट-इन गेम देखील दिल्या आहेत. यात वेदर अपडेट, फाइंड माय फोन, म्यूझिक आणि कॅमेरा कंट्रोल सारखे फीचर्स यात मिळतील. बॅटरीबद्दल सांगायचे तर एकदा चार्जवर वॉचची बॅटरी ७ दिवस सहज टिकेल. तर ब्लूटूथ कॉलिंग फीचर असल्यास बॅटरी २ दिवस टिकते.

हेही वाचा: Flipkart Sale: नववर्षाची खास ऑफर, अवघ्या ६ हजारांच्या बजेटमध्ये मिळतेय वॉशिंग मशीन, पाहा डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT