boat wave ultima smartwatch launched with Bluetooth calling check price and features
boat wave ultima smartwatch launched with Bluetooth calling check price and features 
विज्ञान-तंत्र

boAt ने लॉंच केली कॉलिंग फिचर असेलेली स्मार्टवॉच; जाणून घ्या खास फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

वेअरेबल ब्रँड boAt ने भारतीय बाजारात आपले नवीन स्मार्टवॉच boAt Wave Ultima लाँच केली आहे. हे घड्याळ ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह सादर करण्यात आले आहे. घड्याळ सुपर-ब्राइट क्रॅक-रेसिस्टंट कर्व्ह्ड आर्क डिस्प्लेला सपोर्ट दिला आहे. BoAt Wave Ultima तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – Raising Red, Active Black आणि Teal Green. त्याची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली असून हे घड्याळ कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते.

boAt Wave Ultima चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्मार्टवॉच 1.8-इंच कर्व्ड आर्क डिस्प्लेसह येते, जी 500 nits ब्राइटनेससह येते. घड्याळासोबत अलवेज ऑन डिस्प्ले सपोर्ट उपलब्ध आहे. घड्याळासोबत ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. इंनबिल्ट HD स्पीकर आणि हाय सेंसिटीव्हिटी मायक्रोफोन सपोर्ट देखील या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आला आहे. यासोबत अल्ट्रा-सीमलेस ब्लूटूथ कॉलिंगचा एक्सपिरिएंस मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

boAt Wave Ultimaमध्ये धावणे, चालणे, योग स्विमींग आणि ऑटो वर्क-आउट डिटेक्शन सारख्या फीचर्ससह 100 हून अधिक स्पोर्ट्स मोडसह येते. त्याच वेळी, रक्तातील ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी SpO2, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटरिंग आणि स्लीप मॉनिटरिंग सारखे सेन्सर उपलब्ध आहेत. यासोबतच म्युझिक कंट्रोल, फ्लॅशलाइट, फाइंड माय फोन, डीएनडी, वर्ल्ड क्लॉक, स्टॉपवॉच, वेदर फोरकास्ट अशी अनेक फिचर्स उपलब्ध आहेत.

boAt Wave Ultima ची बॅटरी लाइफ किती?

boAt Wave Ultima तुम्हाला यामध्ये एकापेक्षा अधिक वॉच फेसेससह रिंगटोन बदलता येते. वॉटर रेसिस्टंटसाठी घड्याळाला IP68 रेटिंग मिळते. boAt Wave Ultima च्या बॅटरीबद्दल कंपनीचा दावा आहे की हे घड्याळ कॉल न करता 10 दिवस आणि कॉलिंगसह 3 दिवस चालवता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT