Boult Audio AirBass Y1  
विज्ञान-तंत्र

स्वस्तात मस्त इअरबड्स, मिळेल तब्बल ४० तासांची बॅटरी लाईफ; पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

Boult Audio AirBass Y1 : जर तुम्ही नवीन इअरबड्स खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि असे इअरबड्स शोधत असाल जे त्यांना वारंवार चार्ज करत बसावे लागणार नाहीत, तर Boult चे हे नवीन इअरबड तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकतात असू शकतात. कंपनीने गुरुवारी त्यांचे नवीन Boult Audio AirBass Y1 इयरबड भारतात लॉन्च केले आहेत.

नवीन AirBass Y1 TWS इयरबड्स हे देशातील कंपनीच्या TWS इयरफोन लाइनअपमध्ये लेटेस्ट लॉंच आहेत आणि त्यांचे सर्वात महत्वाचे फीचर म्हणजे त्यांना 40 तासांपर्यंत बॅटरीलाइफ आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की वापरकर्ते सिंगल-चॅनल ऑडिओसह सिंगल इअरबडवर कॉलिंग आणि संगीताचा आनंद घेऊ शकतात. या इयरबड्सना एक एंगल्ड डिझाइन देण्यात आले आहेत. ते पाणी आणि घाम या दोन्हीसाठी रेजिस्टंट IPX5 रेटेड आहेत.

AirBass Y1 ची किंमत किती आहे

भारतात नवीन Boult AirBass Y1 ची किंमत 1299 रुपये आहे. आणि TWS इयरबड्स ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येतील. हे एअरबड्स फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्धअसतील. ग्राहक नवीन Boult AirBass Y1 वर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर पाच टक्के कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

Boult Audio AirBass Y1 इयरबड्सचे फीचर्स

यामध्ये वन एंगल्ड डिझाइन आणि ABS बॉडी देण्यात आली आहे येतात. AirBass Y1 वर वापरल्या जाणार्‍या ड्रायव्हर्सचा आकार कंपनीने अद्याप उघड केलेला नाही.वायरलेस इयरबड चार्जिंग केससह 40 तासांपर्यंत प्लेबॅक देतात. केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये त्यांना 100 मिनिटांचा प्लेबॅक टाइम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. इअरबड्स 'मोनोपॉड' मोडमध्येही वापरता येतील.

हे वायरलेस इअरबड्स ब्लूटूथ 5.1 सपोर्ट आणि मीडिया प्लेबॅक आणि कॉल टेकिंगसाठी टच कंट्रोल सपोर्टसह येतात. Boult AirBass Y1 ला घाम आणि पाणी रेजिस्टंट IPX5 रेट केले गेलेले आहे, याचा अर्थ ते वर्कआउट दरम्यान वापरले जाऊ शकतात. कंपनीच्या मते, TWS इयरबड्स ट्रिपल टॅप जेश्चरसह गुगल असिस्टंट आणि सिरीला देखील सपोर्ट करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT