Seatbelt History
Seatbelt History sakal
विज्ञान-तंत्र

Seatbelt History : मुंबईकरांना कंपल्सरी झालेल्या सीटबेल्टचा इतिहास माहीत आहे का?

सकाळ डिजिटल टीम

1 नोव्हेंबर पासून मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल,  असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. 1 नोव्हेंबरपासून शहरात चारचाकी वाहन चालक आणि प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. एका निवेदनात,  मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक युनिटने सर्व वाहनचालक आणि वाहनधारकांना 1 नोव्हेंबरपूर्वी चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्टची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण वाहन सुरक्षेबाबत सातत्याने ऐकतोय. यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा कार अपघातात मृत्यू होतो. दरम्यान, लोकांचा वाहन प्रवास सुरक्षित करण्यावर, वाहनांच्या सेफ्टी फीचर्सवर कार कंपन्या काम करत आहेत.

सुरक्षित वाहन प्रवासातील पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे सीटबेल्ट. हा सीटबेल्ट नेमका कशासाठी बनवला होता याची रंजक गोष्ट आहे. सीट बेल्टच्या शोधाचं श्रेय सर जॉर्ज कॅली (Sir George Cayley) यांना जातं. 1800 च्या सुमारास त्यांनी ग्लायडरसाठी (Glider) सीट बेल्ट डिझाइन तयार केले. विमान वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाच्या संशोधकांमध्ये कॅली यांची गणना केली जाते. मात्र त्यांचं डिझाईन सुरुवातीला कारमध्ये उपयुक्त ठरलं नाही. अमेरिकन संशोधक एडवर्ड क्लॅगहॉर्न (Edward Claghorn) यांनी कारसाठी पहिला सीट बेल्ट डिझाइन केला. क्लॅगहॉर्न यांनी 1885 मध्ये सीट बेल्ट डिझाईन केला आणि न्यूयॉर्कमधील टॅक्सीमध्ये त्याचा वापर केला गेला.

1940 पर्यंत सीटबेल्टची लोकप्रियता वाढली. मात्र सुरुवातीच्या काळात सीट बेल्टमुळे फारशी सुरक्षितता मिळत नव्हती. त्या डिझाईनमध्ये काही त्रुटी होत्या. 1946 मध्ये डॉ. सी. हंटर शेल्डन (Dr C Hunter Shelden) यांनी रीट्रॅक्टेबल सीट बेल्ट (Retractable Seat Belt) डिझाईन केला. एअरबॅग्ज आणि रिसेस्ड स्टीयरिंग व्हील सारख्या सेफ्टी स्टँडर्ड्सचं श्रेय देखील त्यांनाच जातं. डॉ. शेल्डनच्या डिझाइननंतर सीट बेल्टची लोकप्रियता वाढली आणि 1950 च्या आसपास जवळजवळ सर्व रेसिंग कारमध्ये सीट बेल्टचा वापर केला जाऊ लागला. नंतर रेसिंग कारमध्ये सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आला.

रेसिंग कार्समध्ये सीट बेल्ट अनिवार्य केल्यानंतर प्रवासी वाहनांमध्ये देखील सीट बेल्ट दिले जाऊ लागले. 1950 च्या दशकात त्याची सुरुवात झाली. नॅश आणि फोर्ड या कंपन्या या बाबतीत आघाडीवर होत्या. या दोन्ही कंपन्यांनी पर्यायी सीट बेल्ट देण्यास सुरुवात केली, ज्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. मात्र ग्राहक सीट बेल्टशिवाय कार खरेदी करणं पसंत करायचे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तेव्हा केवळ 2 टक्के ग्राहक त्यांच्या कारमध्ये सीट बेल्ट वापरत होते. स्वीडिश कार निर्माती कंपनी साबने (Saab) पहिल्यांदाच आपल्या कारसाठी सीट बेल्ट एक स्टँडर्ड फीचर म्हणून सादर केलं. त्यानंतर व्हॉल्वो कंपनीने त्यांच्या वाहनांमध्ये सीट बेल्ट अनिवार्य केला.

सीट बेल्टच्या डिझाइनमध्ये सतत सुधारणा होत आहे. आता चार, पाच, सहा किंवा अगदी 7 पॉइंट सीट बेल्ट आले आहेत. हे सर्व प्रामुख्याने रेसिंग कारमध्ये वापरले जातात. मुलांच्या सुरक्षेसाठी बसवलेले सीट बेल्टही मल्टी पॉइंट आहेत. यामध्ये, पाय आणि खांद्याचे संरक्षण करण्यासाठी लॅपच्या भागाचा पट्टा बेल्टला जोडलेला असतो. विमानात पायलटच्या सीटवर 7 पॉइंट सीट बेल्ट वापरला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT