BSNL Leads with Cheap Recharge Plans Rs 91 for 90 Days esakal
विज्ञान-तंत्र

BSNL Rechage Plan : BSNL धमाका ऑफर! फक्त 91 रुपयांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांची वैधता, कॉलिंग अन् डेटासह इतर भन्नाट सुविधा

BSNL Network Recharge : बीएसएनएल कंपनीने फक्त ९१ रुपयांना ९० दिवसांची वैधता देणारा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.

Saisimran Ghashi

BSNL Recharge : देशातील दूरसंचार क्षेत्रात कडाक्याची स्पर्धा असतानाही बीएसएनएलने ग्राहकांना आणखी एक धमाकेदार ऑफर दिली आहे. कंपनीने फक्त ९१ रुपयांमध्ये ९० दिवसांची वैधता देणारा रिचार्ज प्लॅन लॉंच केला आहे. या प्लॅनमुळे ग्राहकांना मोठीच दिलासा मिळणार आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या दरात वाढ केली असताना बीएसएनएलने मात्र जुने दर कायम ठेवले आहेत. अन्य खाजगी नेटवर्क कंपन्या म्हणजेच जेव्हा एअरटेल आणि वोडाफोन ने रिचार्ज घरांमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे ग्राहक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे ग्राहकांचा कल बीएसएनएलकडे वळू लागला आहे. कंपनीने १०० रुपयांपेक्षा कमी दरात अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत.

या नव्या ९१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ९० दिवसांची वैधता, मिनिटाला १५ पैसे कॉलिंग चार्ज, मेगाबायटला १ पैसा डेटा चार्ज आणि एसएमएसला २५ पैसे असे बेसिक बेनिफिट्स मिळणार आहेत. कॉलिंग आणि डेटाचा वापर अधिक करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त टॉप-अप घ्यावे लागेल.

दरम्यान, बीएसएनएलने १०७ रुपयांचा आणखी एक प्लॅन सादर केला आहे. यामध्ये ३५ दिवसांची वैधता, सर्व नेटवर्कवर २०० मिनिटांची कॉलिंग आणि ३ जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. मात्र, मर्यादित डेटामुळे हा प्लॅन मोठ्या डेटा वापराऱ्यांना फायदेशीर ठरणार नाही.

बीएसएनएलच्या या दोन्ही प्लॅनमुळे ग्राहकांना खर्चात मोठी बचत होणार आहे. या प्लॅनमुळे कंपनीलाही ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

रिचार्जमधील दरवाढीमुळे ग्राहक वर्ग आधीच स्वस्त आणि किफायतशीर रिचार्ज प्लॅन आणि नेटवर्क सुविधा असणाऱ्या नेटवर्क कडे वळत आहेत.अशात बीएसएनएलकडून दिल्या जाणाऱ्या कमी दरातल्या या सुविधांमुळे ग्राहक वर्ग नक्कीच बीएसएनएलकडे जास्त आकर्षित होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT