BSNL Gains Popularity with Budget-Friendly Rs 107 Recharge Plan esakal
विज्ञान-तंत्र

BSNL Recharge Plan : शंभर रुपयांचा रिचार्ज अन् चक्क 35 दिवसांची वैधता;अनलिमिटेड कॉलिंग,डेटाचा BSNL बंपर प्लॅन काय आहे?

BSNL Budget-Friendly Recharge : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या किफायतशीर रिचार्ज प्लॅन्समुळे देशभरात धमाका केला आहे.त्यातीलच एक म्हणजे फक्त १०७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन.

Saisimran Ghashi

BSNL Network Recharge : भारतातील खाजगी नेटवर्क कंपन्यांनी 3 जुलैला त्यांचे रिचार्ज दरांमध्ये मोठी वाढ केली त्यामध्ये एअरटेल,जिओ आणि वोडाफोन आयडिया म्हणजेच vi यांचा समावेश होता.या दरवाढीमुळे ग्राहक वर्ग प्रचंड नाराज आहे.

अनेक ग्राहक अन्य स्वस्त रिचार्ज प्लान असलेल्या नेटवर्ककडे वळत आहेत. अशात सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या किफायतशीर रिचार्ज प्लॅन्समुळे देशभरात धमाका केला आहे. जियो, एअरटेल आणि वोडाफोन-आइडिया यांसारख्या खासगी कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सच्या दरात वाढ केली असताना, BSNL ने आपल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी अनेक किफायतशीर प्लॅन्स आणले आहेत.

त्यातीलच एक म्हणजे फक्त १०७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३५ दिवसांची वैधता मिळते. अन्य कंपन्यांच्या तुलनेत ही एक मोठी बाब आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगऐवजी २२० मिनिटांची कॉलिंग सुविधा मिळते. पण हो, या प्लॅनमध्ये डेटा फक्त ३GB आहे.

जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर BSNL चा १०८ रुपयांचा प्लॅनही तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला रोज १GB डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा २८ दिवसांसाठी मिळते.

दरम्यान, BSNL ने आपल्या ग्राहकांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. त्यांनी देशभरात आपली 4G सेवा सुरू केली आहे. यामुळे देशभरात उच्च गती इंटरनेट पोहोचवण्याच्या दिशेनं महत्त्वाची पाऊलं उचलली गेली आहेत. याशिवाय कंपनीने 5G तंत्रज्ञानाच्या चाचण्याही सुरू केल्या आहेत.

BSNL ने आतापर्यंत १५ हजारांहून अधिक 4G साइट्स सक्रिय केल्या आहेत. या सर्व साइट्समध्ये भारतातच तयार केलेले उपकरणे वापरण्यात आली आहेत. यामुळे बीएसएनएलची 4G सेवा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे.

BSNL च्या या कदमांमुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात नक्कीच चांगली स्पर्धा निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

Video Viral : फिल ह्यूजचा जीव गेला, तसाच चेंडू Ben Stokes च्या मानेवर आदळला; क्षणभर काळजाचा ठोका चुकला, मिचेल स्टार्क धावला...

१५ वर्षांचा संसार अन् अचानक धक्का! लक्ष्मीकांत बर्डेंचा पहिल्या पत्नीवर होता प्रचंड जीव, पत्नीच्या निधनानंतर म्हणालेले...

Latest Marathi News Live Update : वैजापूरमध्ये बिबट्या विहिरीत अडकला

SCROLL FOR NEXT