BSNL Enhances Connectivity with 4G, 5G-Ready OTA Platform esakal
विज्ञान-तंत्र

BSNL Network in India : देशाच्या कानाकोपऱ्यात BSNL 4G आणि 5G नेटवर्क पोहोचणार; नुकतचं लाँच झालेलं युनिव्हर्सल सिम कार्ड आहे तरी काय?

BSNL 4G and 5G OTA Network Service : खाजगी नेटवर्क कंपन्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या रिचार्ज दरवाढीवर नाराज होऊन असंख्य ग्राहकांनी आपले मोबाईल नेटवर्क BSNL कडे स्विच केले.अश्यात देशातील दूरसंचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची बाब घडली आहे.

Saisimran Ghashi

BSNL Network Update : देशभरातील खाजगी नेटवर्क कंपन्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला रिचार्जच्या दरामध्ये वाढ केली होती.या दरवाढीवर नाराज होऊन असंख्य ग्राहकांनी आपले मोबाईल नेटवर्क BSNL कडे स्विच केले.अश्यात देशातील दूरसंचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची बाब घडली आहे.

भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. कंपनीने 4G आणि 5G तयार ओवर-द-एअर (ओटीए) आणि युनिव्हर्सल सिम (यूएसआईएम) प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.

या सुविधेमुळे बीएसएनएलच्या सेवांची गुणवत्ता आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होणार आहे. तसेच, ग्राहकांना आता कोणत्याही भौगोलिक अडचणीशिवाय आपल्या सिम कार्ड्स स्वॅप करणे शक्य होणार आहे.

बीएसएनएलच्या या नव्या प्लॅटफॉर्ममुळे नेटवर्कची स्पीड वाढणार असून कवरेजही अधिक चांगले होणार आहे. याशिवाय नंबर पोर्टेबिलिटी आणि सिमकार्ड बदलण्याच्या प्रक्रियेलाही चालना मिळणार आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवि ए. रॉबर्ट जेरार्ड यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकाला कोणत्याही भौगोलिक अडचणीशिवाय सिमकार्ड बदलता येणार आहे. तसेच सिमकार्डवरील माहिती व्यवस्थापन आणि बदल करणेही सोपे होणार आहे.

बीएसएनएलचा हा प्लॅटफॉर्म भारतातील 4G आणि 5G दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करेल. कंपनीने २०२५ च्या मार्चपर्यंत 4G सेवा पूर्णपणे सुरू करण्याचे ठरवले असून त्या दिशेने काम सुरू आहे. यानंतर ६ ते ८ महिन्यांत 5G सेवाही सुरू करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. यामुळे ग्रामीण आणि अगदी डोंगराळ भागातही डिजिटल दरी कमी होण्यास मदत होणार आहे.

बीएसएनएलने आतापर्यंत १५ हजार नेटवर्क टावर्स उभारले आहेत. कंपनीचा या वर्षी ऑक्टोबरपर्यंत हा आकडा वाढवून ८० हजार करण्याचा प्लॅन आहे. यामुळे देशभरात बीएसएनएलच्या सेवांचा विस्तार होणार आहे.

बीएसएनएलच्या या नव्या प्लॅटफॉर्ममुळे दूरसंचार क्षेत्रात एक नवी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा आणि दरांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

बीएसएनएलच्या या महत्वकांक्षी प्रकल्पाला यश येऊन देशाच्या दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT