Mothers Day BSNL Recharge Plans Offers esakal
विज्ञान-तंत्र

Mothers Day Recharge : मदर्स डे निमित्त 'या' बड्या कंपनीने आणली सुपर ऑफर! जास्त दिवसांच्या वैधतेसह 2 रीचार्ज प्लॅन्स लॉन्च

Mothers Day BSNL Recharge Plans Offers : मदर्स डेच्या निमित्ताने टेलीकॉम कंपनीने दोन रिचार्ज प्लॅन्सवर अतिरिक्त वैधतेची ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर फक्त १४ मेपर्यंत आणि अधिकृत वेबसाइटवर रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे

Saisimran Ghashi

Mothers Day Recharge Plans : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी मदर्स डे च्या निमित्ताने खास सवलतींची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत दोन प्रमुख प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर ग्राहकांना अतिरिक्त वैधता (validity) मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, फक्त बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे.

कोणते प्लॅन आहेत या ऑफरमध्ये?

  1. 1,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
    यामध्ये नेहमी ३६५ दिवसांची वैधता असते, पण ऑफर अंतर्गत ३८० दिवसांची वैधता दिली जात आहे.
    फायदे: 600GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि दररोज 100 SMS.

  2. 1,499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
    पूर्वी ३३६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये आता ३६५ दिवसांची वैधता मिळेल.
    फायदे: 24GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि दररोज 100 SMS.

ऑफरची कालमर्यादा

ही खास मदर्स डे ऑफर ७ मे ते १४ मे २०२५ पर्यंतच उपलब्ध आहे. या कालावधीदरम्यान बीएसएनएल वेबसाइटवरून रिचार्ज केल्यासच ही सुविधा लागू होईल.

ही ऑफर सुरू करताना बीएसएनएलने पुन्हा एकदा आपली ओळख स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून अधोरेखित केली आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदेशीर सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा? सचिनची होणारी सून आहे मुंबईतील बिझनेसमनची नात

Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

SCROLL FOR NEXT