BSNL's unlimited 4G data offer 
विज्ञान-तंत्र

BSNLची ग्राहकांना भेट! ३१ डिसेंबरपर्यंत 4G सिम-कार्ड देणार मोफत

शरयू काकडे

नवी दिल्ली : देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) सणासुदीला भन्नाट ऑफर सुरु केली आहे. बीएसएनएलने 4G सिम कार्ड मोफत देण्याच्या ऑफरची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारच्या दूरसंचार विभागाने ही ऑफर लॉन्च केली होती. ज्या ग्राहकांना १०० किंवा त्यापेक्षा जास्तीचा पहिलं रिचार्ज कुपन मिळविण्याचे आहे त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.

सरकारच्या दूरसंचार विभागाने ग्राहकांसाठी मोफत नवीन 4G सिमकार्ड ते MNP पोर्ट-ईनची ऑफर सुरु केली होती. सरकारच्या मालकीची असलेली दूरसंचार कंपनीने नवीन सिम कार्डसाठी २० रुपयाचे शुल्कही माफ केले आहे आणि ज्या ग्राहकांना 100 किंवा त्याहून अधिक रुपयांचे पहिले रिचार्ज कुपन मिळाले आहे त्यांना MNPपोर्ट-इनची सुविधा देत आहे.

कुठे मिळेल सिम कार्ड?

सध्या बीएसएनएलमार्फत केरळमध्ये ही मोफत सेवा सुरु आहे पण लवकरच ही सेवा इतर टेलिकॉम सर्कलमध्ये सुरु होईल. BSNL मोफत 4G सिम ऑफर BSNL ग्राहक सेवा केंद्र (BSNL CSCs) आणि BSNL च्या रिटेल विक्रेत्यांकडे मिळू शकते.

बीएसनएलने ६९९च्या ९० दिवसांच्या प्रमोशनल प्लॅनची मुदत देखील वाढविली आहे. सरकाराच्या दूरसंचार विभाग या प्लॅनसाठी १८० दिवसांची मुदत ऑफर केली आहे. हा २८ सप्टेंबरला समाप्त झाला होता. पण सरकारच्या दूरसंचार विभागाने त्याची मुदत ९० दिवसांनी वाढवली आहे. यासोबतच ५ जीबी डेली डेटा, अनलिमिटेड कॉल, रोज १०० SMS असे इतर फायदेही मिळणार आहेत. आता या प्लॅनची मुदत तीन महिन्यांनी वाढविली आहे. म्हणजे हा प्लॅन जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल. ग्राहकांनी १२३ वर SMS केल्यावर किंवा USSD short code डाईल केल्यानंतर रिटेल विक्रेत्यांकडे हा प्रीपेड प्लॅन मिळेल. ?

कसे अॅक्टिव्ह कराल सिम कार्ड?

बीएसएनएलचा ६९९ चा प्लॅन सर्व नवीन प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. बीएसएनएलचे ग्राहक PLAN BSNL699 असा SMS १२३ पाठवून कार्ड अॅक्टिव्हेट करू शकतात. तसेच *444*699# हा USSD short code डाईल करून देखील सिमकार्ड अॅक्टिव्हेट करू शकतात. विद्यमान ग्राहकांनी SMS किंवा USSD short code डाईल करण्यापूर्वी त्यांच्या प्रीपेड अकांउटमध्ये ६९९ रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स आहे का हे तपासून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Model Antara Banerjee FIR : अभिनेत्रीचा धावत्या ट्रेनमध्ये RPF जवानावर रेझर ब्लेडने हल्ला; आधी स्वत:चे कपडे काढले अन् मग...

आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पडद्यावर सलमान-संजयची जोडी झळकणार, '7 डॉग्स' कधी होणार प्रदर्शित?

Sunetra Pawar: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ ॲप

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

SCROLL FOR NEXT