iPhone 13 Sakal
विज्ञान-तंत्र

iPhone Offer: तब्बल २५ हजारांच्या डिस्काउंटसह मिळतेय 'हे' लेटेस्ट आयफोन मॉडेल, जाणून घ्या डिटेल्स

आयफोन १३ ला २५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. या फोनला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Discount on Apple iPhone 13: आयफोन खरेदी करण्याचा विचार असेल व किंमतीमुळे टाळत असाल, तर काळजी करू नका. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Apple iPhone 13 बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर आणि बँक कॅशबॅकचा फायदा मिळाल्यास फोन फक्त ४५,२०० रुपयात तुमचा होईल.

आयफोन १३ वर मिळत आहे बंपर डिस्काउंट

IPhone 13 च्या १२८ जीबी व्हेरिएंटची मूळ किंमत ६९,९०० रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर ३,४९५ रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या डिस्काउंटनंतर फोनला फक्त ६५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला फोनला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा देखील जबरदस्त फायदा मिळेल.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

एक्सचेंज ऑफरचा मिळेल फायदा

iPhone 13 च्या खरेदीवर १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. परंतु, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. तुम्हाला बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा फायदा मिळाल्यास ५ टक्के डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे, एकूण २४,७०० रुपयांची बचत होईल. ऑफरनंतर फोनला फक्त ४५,२०० रुपयात खरेदी करू शकता. Apple iPhone 13 हा स्टारलाइट, पिंक, मूनलाइट, रेड, ब्लू आणि ग्रीन रंगात येतो.

iPhone 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आयफोन १३ मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन सिरेमिक शील्ड प्रोटेक्शनसह येतो. यात ए१५ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. डिव्हाइस १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे.

IPhone 13 ड्यूल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि सेकंडरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळेल. स्मार्टफोनला पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपी६८ रेटिंग मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT