BYD Seal eSakal
विज्ञान-तंत्र

BYD Seal India Launch : टेस्लाप्रमाणे स्टायलिश लुक, तब्बल 700 किलोमीटर रेंज.. भारतात लाँच होणार खास इलेक्ट्रिक सेडान! किती आहे किंमत?

BYD Seal ही कार टेस्लाच्या मॉडेल 3 ची प्रतिस्पर्धी मानली जाते. 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती.

Sudesh

BYD Seal Electric Sedan India Launch : इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपन्यांमध्ये तुलनेने नवीन असणारी BYD आता भारतात जम बसवत आहे. आता ही कंपनी भारतात सील ही इलेक्ट्रिक सेडान कार लाँच करणार आहे. ड्युअल मोटर लेआऊट असणारी ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 700 किलोमीटरची रेंज देईल.

BYD Seal ही कार टेस्लाच्या मॉडेल 3 ची प्रतिस्पर्धी मानली जाते. 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. यामध्ये 82.5kWh क्षमतेचा बॅटरीपॅक दिला आहे. केवळ 3.8 सेकंदात ही कार 0 ते 100 kmph एवढा स्पीड पकडू शकते. कंपनीतील बॅटरीपॅक 530bhp पॉवर जनरेट करु शकते. ही कार मार्चमध्ये भारतात लाँच केली जाऊ शकते. (Upcoming Electric Car)

या कारचे इंटेरिअर अगदी आधुनिक आणि स्टायलिश आहेत. यामध्ये ट्रेडमार्क रोटेटिंग 15.6 इंच टचस्क्रीन, पॅनारोमिक सनरूफ, 12 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, स्पोर्ट्स सीट्स असे कित्येक फीचर्स दिले आहेत. गाडीच्या पुढच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी 12 लीटर स्पेस मिळतो. तर, मागच्या बाजूला 400 लीटर क्षमतेची डिकी देण्यात आली आहे. (BYD Electric Cars)

किती असेल किंमत?

या कारची नेमकी किंमत किती असू शकते हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र ही कार ह्युंडाई आयोनिक 5 किंवा अन्य प्रीमियम इलेक्ट्रिक कार्सच्या रेंजमध्ये असेल, असं म्हटलं जात आहे. भारतात ही कंपनी नवीन असली, तरी ग्लोबल लेव्हलला BYD ने अनेक कार्स लाँच केल्या आहेत. या कार्स देखील हळू-हळू भारतात लाँच होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT