Car Buying Tips maruti swift vs tata tiago comparison know which one best
Car Buying Tips maruti swift vs tata tiago comparison know which one best  
विज्ञान-तंत्र

Car Buying Tips: मारुती सुझुकी स्विफ्ट की टाटा टियागो? स्वस्तात चांगली कार कोणती? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Car Buying Tips: जर तुम्ही परवडणाऱ्या पैशात चांगली कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आज आपण येथे दोन स्वस्त कारबद्दल बोलणार आहोत. यामध्ये आम्ही मारुती सुझुकी आणि टाटा टियागो यांचा समावेश केला आहे. या दोन्ही कारची बाजारात मागणी खूप आहे, त्यामुळे कमी बजेटमध्‍ये कार खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता आहे ते जाणून घेऊया.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Tiago ची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 7.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. मारुती स्विफ्टची किंमत 5.91 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 8.84 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

दोन्ही गाड्यांमध्ये काय खास आहे?

नवीन मारुती सुझुकी स्विफ्टच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, तुम्हाला त्यामध्ये उत्तम हँडलिंग रिस्पॉन्स आणि चांगली फ्युअल इकॉनॉमिक्स पाहायला मिळते. दुसरीकडे, जर आपण Tata Tiago बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला G-NCap चे 4 स्टार सुरक्षा रेटिंग पाहायला मिळेल, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप चांगले आहे.याशिवाय टाटा टियागोमध्ये एक प्रशस्त केबिन मिळते.

दोन्ही कारमध्ये काय खराबी आहे

सुरक्षिततेच्या बाबतीत मारुती सुझुकी स्विफ्ट टाटा टियागोपेक्षा कमी सुरक्षित आहे. त्याच वेळी, या कारमध्ये तुम्हाला रियल एसी व्हेंट्स देखील मिळत नाहीत. यामध्ये तुम्हाला तेच जुने जुने इंटेरिअर पाहायला मिळते. Tata Tiago बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला त्यात फार कमी फीचर्स पाहायला मिळतील. त्या तुलनेत स्विफ्टमध्ये तुम्हाला आणखी फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला नो टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळते.

दोघांचे इंजिन कसे आहेत?

मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये तुम्हाला 1197cc Advance K सीरीज डबल जेट, ड्युअल VVT, 4 सिलेंडर इंजिन पाहायला मिळते. दुसरीकडे, Tata Tiago मध्ये तुम्हाला 1199cc Revotron 1.2 लीटर, 3 सिलेंडर इंजिन मिळते.

बूट स्पेस, फ्युल टँक आणि आसन क्षमता

दोन्ही वाहनांमध्ये उपलब्ध असलेल्या बूट स्पेसबद्दल बोलायचे झाल्यास, स्विफ्टला 268 लीटरची बूट स्पेस मिळते. त्याच वेळी, तुम्हाला Tata Tiago मध्ये 242 लीटर बूट स्पेस मिळेल. दोन्हीमध्ये आसनक्षमता फक्त 5 लोकांची आहे. फ्युल टँकबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला स्विफ्टमध्ये 37L फ्युल टँक आणि Tata Tiago मध्ये 35L फ्युल टँक पाहायला मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT