Car Tyre
Car Tyre Sakal
विज्ञान-तंत्र

Car Tyre : आता गाडीत हवा भरायची गरजचं नाही; आले खास टायर

सकाळ डिजिटल टीम

Airless Tyre : टायर हा सर्व वाहनांचा एक महत्त्वाचा भाग आहे, टायरशिवाय वाहन चालवणे जवळजवळ अशक्यच आहे. सुरूवातीच्या काळात गाड्यांचे टायर अत्यंत कमकुवत आणि निकृष्ट दर्जाचे होते, त्यानंतर यामध्ये सुधारणा होत गेली. मात्र, टायरमध्ये नियमित हवा भरणे काही सुटले नाही. मात्र, आता ही कटकटदेखील संपणार आहे.

सध्या वाहनांमध्ये ट्यूबलेस टायरचा वापर केला जातो, याचे वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर झिजत नाहीत आणि पंक्चर झाल्यानंतरही ते लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात. पण आता याही पुढे जात एक पाऊल पुढे टाकत एका वेगळ्या टायरची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये हवा भरण्याची गरज नाही आणि ते कधीही पंक्चर होणार नाही. हे टायर एअरलेस टायर म्हणून ओळखले जाते. गुडइयर आणि मिशेलिन सारख्या कंपन्या अशा टायरची निर्मिती करतात.

एअरलेस टायर्स म्हणजे काय?

एअरलेस टायर्स म्हणजे ते टायर ज्यामध्ये हवा भरण्याची गरज नसते. हे टायर रबर स्पोक आणि बेल्ट वापरून डिझाइन केलेले असतात. वाहनाचे वजन वाहून नेण्यासाठी या टायरमध्ये मजबूत आणि पातळ फायबर ग्लास वापरण्यात येतात. विशेष म्हणजे हे टायर कधीही फुटत नाहीत आणि पंक्चरही होत नाहीत. त्यामुळे टायर फुटून होणारे रस्ते अपघात रोखण्यास याची मोठी मदत होते. सध्या टेस्ला ही कंपनी अशा स्वरूपाचे टायर त्यांच्या कारमध्ये वापरत आहे.

या कंपनीने बनवला पहिला एअरलेस टायर

पहिला एअरलेस टायर मिशेलिन नावाच्या कंपनीने लाँच केला असून, त्याची चाचणीही पूर्ण झाली आहे. हे टायर मिशेलिन आणि वाहन निर्माता जनरल मोटर यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. ज्याचा पहिल्यांदा वापर शेवरलेट बोल्ट कारमध्ये करण्यात आला होता. त्याच वेळी, गुडइयरदेखील अशा टायर्सची निर्मिती करते. येत्या काही वर्षांत हे टायर सर्व वाहनांमध्ये दिसतील. काही तज्ज्ञांच्या मते, एअरलेस टायर सध्याच्या टायरपेक्षा जास्त काळ टिकतील. यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल तसेच रबराच्या भंगारातही घट होईल.

एअरलेस टायरचे तोटे काय?

सध्या टायर बनवणाऱ्या कंपन्या या टायरचे अनेक फायदे सांगत आहेत. पण त्याचे काही तोटेही असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहनाच्या मायलेजवर परिणाम होऊ शकतो. तसेच याच्या लाईफविषयी आत्तापर्यंत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT