Car Insurance  esakal
विज्ञान-तंत्र

Car Insurance : गाडीचा Insurance काढताय? या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान

IDV व्हॅल्यू म्हणजे काय हे माहित नसेल तर त्याचा अर्थ सोप्या भाषेत समजावून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Car Insurance : कार इन्शुरन्स असो किंवा बाईक इन्शुरन्स, जेव्हाही तुम्ही इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा आधी या 3 गोष्टी करा, ज्यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच पण नंतर निर्माण होणार्‍या समस्याही बऱ्याच अंशी दूर होतील.

IDV व्हॅल्यूकडे लक्ष द्या

जर तुम्हाला IDV व्हॅल्यू म्हणजे काय हे माहित नसेल तर त्याचा अर्थ सोप्या भाषेत समजावून घ्या. तुमची कार चोरीला गेल्यास किंवा अपघातात खराब झाल्यास कंपनी तुम्हाला ही व्हॅल्यू देते. अशा परिस्थितीत इन्शुरन्स खरेदी करताना कोणती कंपनी तुम्हाला जास्त IDV व्हॅल्यू देत आहे हे तपासा, जरी तुम्ही जास्त IDV व्हॅल्यू घेतली तर तुमचा प्रीमियमही जास्त असेल.

इन्शुरन्स प्रीमियमकडे बघून घ्या

इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी तुम्ही कंपनीला जे पैसे भरता त्याला प्रीमियम म्हणतात. त्यामुळे इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी, कोणती कंपनी तुम्हाला सर्वोत्तम प्रीमियम ऑफर करत आहे ते तपासा. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अनेक स्वस्त प्रीमियम स्कीम देखील उपलब्ध आहेत. पण या योजनांमुळे, इन्शुरन्सचे काही फायदे कमी होतात, म्हणून तुम्ही तुमच्या गरजांचा विचार करा आणि निवडक योजना आणि प्रीमियम घ्या.

CSR म्हणजे काय? चेक करून घेणे आ

सर्वप्रथम, सीएसआर म्हणजे काय, हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असेल, तर मग त्याचा अर्थ क्लेम सेटलमेंट रेशो. म्हणजेच तुम्ही ज्या कंपनीचा इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करत आहात, ती कंपनी एका वर्षात विमा सेटल करते आहे का ते बघा. त्यामुळे ज्या कंपनीचा CSR जास्त आहे, त्यांचा प्लान घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT