CarynAI Esakal
विज्ञान-तंत्र

CarynAI : या तरुणीचा एआय क्लोन बनणार तुमची गर्लफ्रेंड; एका मिनिटासाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

हा चॅटबॉट तिचा आवाज, हावभाव तसेच तिची पर्सनॅलिटी यांची हुबेहूब नक्कल करू शकतो.

Sudesh

सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा सगळीकडे बोलबाला सुरू आहे. या तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून लोक पैसा आणि प्रसिद्धी मिळवत आहेत. आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने चक्क स्वतःचा एआय क्लोन बनवून त्यातून कमाई सुरू केली आहे.

जॉर्जियामधील २३ वर्षीय कॅरीन (Caryn Marjorie) या इन्फ्लुएन्सरचे स्नॅपचॅटवर १.८ मिलियन अधिक फॉलोवर्स आहेत. ती दिवसभर आपले फोटो, व्हिडिओ पोस्ट करत राहते. यासोबतच, ती दिवसातील पाच तास टेलिग्राम ग्रुपवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधते.

वेळ कमी आणि फॉलोवर्स जास्त असल्यामुळे कॅरीनला (Caryn Snapchat) आपल्या सर्व चाहत्यांशी संवाद साधता येत नव्हता. त्यामुळेच तिने कॅरीन एआय (CarynAI) हा एक एआय चॅटबॉट लाँच केला. ओपन एआय कंपनीने तयार केलेल्या जीपीटी-४ एपीआय तंत्रज्ञानाचा वापर करून फॉरेव्हर व्हॉईसेस या कंपनीने हा क्लोन तयार केला आहे.

हुबेहूब नक्कल करतो क्लोन

हा चॅटबॉट तिचा आवाज, हावभाव तसेच तिची पर्सनॅलिटी यांची हुबेहूब नक्कल करू शकतो. म्हणजेच तुम्ही या क्लोनसोबत गप्पा माराल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कॅरीन सोबतच गप्पा मारत आहात. आपल्या सर्व चाहत्यांपर्यंत पोहोचता यावं यासाठी हा एआय चॅटबॉट तयार केल्याचं कॅरीनने म्हटलं आहे.

"माझ्या फॅन्सचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे. त्यामुळे दररोज ते मला मेसेज करत असतात. गेल्या वर्षीपासून मला लक्षात आलं, की या सर्वांशी थेट संवाद साधणे शक्य नाही. याबाबत मला खरंच वाईट वाटतं. आपल्या प्रत्येक फॅनसोबत वैयक्तिक गप्पा मारता याव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे." असं कॅरीन म्हणाली.

एका मिनिटासाठी एक डॉलर

या चॅटबॉटसोबत गप्पा मारण्यासाठी कॅरीनने काही चार्जेस ठेवले आहेत. एक मिनिट गप्पा मारण्यासाठी फॅन्सना एक डॉलर, म्हणजेच सुमारे ८२ रुपये एवढी किंमत मोजावी लागणार आहे. लाँच झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच या चॅटबॉटने तब्बल एक लाख डॉलर्सची कमाई केली. याव्यतिरिक्त कित्येक तरुण अजूनही वेटिंग लिस्टमध्ये असल्याचं तिने सांगितलं.

कमावणार भरमसाठ पैसा

कॅरीनचे फॉलोवर्स आणि तिच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांची आतुरता पाहता, कॅरीन लवकरच दर महिन्याला ५ मिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे ४१ कोटी रुपयांची कमाई करू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या क्लोनसोबत होणारं संभाषण हे एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहे. म्हणजेच, फॅनच्या परवानगीशिवाय अगदी कॅरीन स्वतः देखील क्लोनने काय गप्पा मारल्या हे पाहू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT