Chandrayaan-3 Update Sakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Mission : रोव्हर उत्तमरित्या करतोय काम, 8 मीटरचं अंतरही केलं यशस्वीरित्या पार

चांद्रयान-3 मोहीम (Chandrayaan-3 Mission) यशस्वीपणे पार पाडून भारताने नवीन विक्रम केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

चांद्रयान-3 मोहीम (Chandrayaan-3 Mission) यशस्वीपणे पार पाडून भारताने नवीन विक्रम केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. या यशाबद्दल इस्रो आणि आपल्या भारत देशाचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान या मोहीमेबद्दलच्या नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकतीच नवीन अपडेट्स इस्त्रोनं ट्विटर शेअर केले आहेत.

इस्रोने चांद्रयान 3 मोहीमेबाबत दिलेले नवीन अपडेट्स 

"रोव्हरच्या हालचाली व्हेरिफाय करण्यात आल्या आहेत. रोव्हरने सुमारे आठ मीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. रोव्हर पेलोड्स LIBS आणि APXS देखील कार्यरत आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल (propulsion module), लँडर मॉड्यूल (lander module) आणि रोव्हरवरील सर्व पेलोड्स योग्यरित्या कामगिरी करत आहेत", अशी माहिती इस्रोनं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान,  24 ऑगस्टला रात्री देखील इस्रोने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या थोड्या वेळापूर्वीचा हा व्हिडीओ होता.  

भारताने रचला इतिहास

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा विक्रम भारताच्या नावे झाला आहे. चांद्रयान-3 हे चंद्रावर 14 दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ आला रे आला! रितेश देशमुखची ग्रँड एंट्री

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

IND vs NZ: किंग कोहलीची घौडदौड कायम; रचला आणखी एक विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, संगकाराला टाकलं मागे

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT