Chandrayaan 3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Update : लँडिंगसाठी उरले काहीच तास; कसा राहिला 'चांद्रयान-3'चा प्रवास?

ISRO Moon Mission : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.

Sudesh

Chandrayaan-3 Landing : भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स सुरू करण्यासाठी इस्रोमधील वैज्ञानिक सज्ज झाले आहेत. आता केवळ लँडर मॉड्यूल हे अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली. ALS कमांड मिळाल्यानंतर लँडर मॉड्यूलमधील इंजिन सुरू होतील, आणि ते खाली उतरण्यास सुरुवात करेल. यावेळी मिशन ऑपरेशन्स टीम या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असेल, असंही इस्रोने स्पष्ट केलं.

कसा राहिला प्रवास?

चांद्रयान-2 अगदी शेवटच्या टप्प्यात जाऊन चंद्रावर क्रॅश झालं होतं. त्यानंतर इस्रोने खचून न जाता, लगेच चांद्रयान-3 मोहिमेची तयारी सुरू केली होती. त्यानंतर, सुमारे चार वर्षं या मोहिमेवर काम सुरू होतं. अखेर, यावर्षी सहा जुलै रोजी इस्रोने बहुप्रतिक्षित चांद्रयान-3 लाँचिंगची तारीख जाहीर केली होती.

14 जुलै रोजी लाँचिंग होण्यापूर्वी, 11 जुलै रोजी चांद्रयान-3 मोहिमेची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये यानाच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. अखेर, 14 जुलै रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी चांद्रयान-3 लाँच करण्यात आलं. यासाठी LMV-3 या भारताच्या विश्वासू आणि शक्तिशाली रॉकेटचा वापर करण्यात आला.(Latest Marathi News)

यानंतर 15 जुलै, 17 जुलै, 18 जुलै, 20 जुलै आणि 25 जुलै या दिवशी टप्प्याटप्प्याने चांद्रयान पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षांमध्ये ढकलण्यात आलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं आणि चंद्राच्या दिशेने रवाना झालं.

5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. यानंतर त्याने चंद्राच्या कक्षांमधून पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू केला. 17 ऑगस्टला चांद्रयानातील लँडर मॉड्यूल आणि प्रॉपल्शन मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर 18 ऑगस्टला चांद्रयानाची पहिली डीबूस्टिंग प्रक्रिया पार पडली. 20 ऑगस्टला दुसरी डीबूस्टिंग प्रक्रिया पार पडली, आणि विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यासाठी जागा शोधू लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT