Chandrayaan-3 Update Sakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 update: ISROनं पुढे ढकलला प्लान; विक्रम, प्रज्ञान पुन्हा कधी होणार सुरु?

चंद्राच्या ज्या भागात विक्रम लँडर उतरलं आहे तिथं चौदा दिवसांनंतर पुन्हा एकदा सूर्य उगवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Chandrayaan 3 update : चांद्रयान ३ बाबतची एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे. त्यानुसार, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपला प्लान बदलला आहे. त्यामुळं आता चंद्रावर असलेला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जे आजच कार्यान्वित करण्यात येतील असं सांगितलं जात होतं पण आता हे काम पुढं ढकलण्यात आलं आहे. (Chandrayaan 3 update Isro postpones plans to revive Vikram Pragyan on Moon)

कधी होणार पुनरुज्जीवित?

स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी सांगितलं की, "चंद्राच्या ज्या भागात विक्रम लँडर उतरलं आहे तिथं चौदा दिवसांनंतर पुन्हा एकदा सूर्य उगवला आहे. त्यामुळं नुकताच आम्ही प्लान केला होता की, २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला पुनरुज्जीवित करायचं. पण काही अपरिहार्य कारणांमुळं हे काम उद्यावर २३ सप्टेंबर पर्यंत ढकलण्यात आलं आहे" इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)

शिवशक्ती पॉईंट

चांद्रयान ३ च्या लॉन्चिंगनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरनं २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या जमिनीवर पाऊल ठेवलं. या ठिकाणाला आता शिवशक्ती पॉईंट म्हणून ओळखलं जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं नामकरण केलं. (Latest Marathi News)

चंद्रावरील मुलद्रव्यांचा लागला शोध

रोव्हर चंद्रावर उतरल्यानंतर त्यानं अनेक मुलद्रव्यांचा शोध घेतला. त्यानुसार, चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन, पाण्याचा अंश असल्याचंही दिसून आलं आहे. त्याचबरोबर हायड्रोजनही चंद्रावर असल्याचं रोव्हरवरील विविध प्रकारच्या उपकरणातून समोर आलं आहे. त्यामुळं ही केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाची गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT