Satya Nadella Sakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT vs Satya Nadella: 'बिर्याणी'वरून सत्या नडेला ChatGPT ला नडले, पाहा नक्की काय घडलं

ChatGPT निबंध लिहिण्यापासून ते प्रश्नांची उत्तरे देण्यापर्यंत अनेक गोष्टी सहज करू शकते. मात्र, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि ChatGPT मध्ये एका गोष्टीवरून मतभेद पाहायला मिळाले.

सकाळ डिजिटल टीम

ChatGPT vs Satya Nadella: Open AI चा चॅटबोट ChatGPT सध्या विशेष चर्चेत आहे. निबंध लिहिण्यापासून ते प्रश्नांची उत्तरे देण्यापर्यंत अनेक गोष्टी ChatGPT सहज करू शकते. मात्र, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि ChatGPT मध्ये एका गोष्टीवरून मतभेद आहेत.

बंगळुरू येथे फ्यूचर रेडी टेक्नोलॉजी समिटमध्ये बोलताना नडेला यांनी ChatGPT ला काही प्रश्न विचारले. मात्र, एआयने दिलेली उत्तरे नडेला यांना काही पटली नाहीत.

नडेला यांनी ChatGPT ला दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय टिफिन पर्याय काय आहे, याबाबत प्रश्न विचारला होता. याचे उत्तर देताना एआयने इडली, डोसा, वडा, पोंगल आणि बिर्याणी अशी मोठी लिस्टच दिली. मात्र, या यादीत बिर्याणीचा समावेश करणे नडेला यांना फारसे आवडले नाही.

बिर्याणीच्या उत्तरावर नडेला यांनी नाराजी व्यक्त केली. यावर उत्तर देताना चॅट रोबोटने त्यांची माफी तर मागितलीच. सोबतच, आपले उत्तर बदलत बिर्याणी पारंपारिक दक्षिण भारतीय टिफिन पर्याय नसल्याचेही मान्य केले.

ChatGPT ने उत्तर दिले की, बिर्याणी भारतीय उपखंडातील एक लोकप्रिय डिश आहे. मसाले, भाज्या आणि मांस यासोबत याचे सेवन केले जाते. तसेच, दह्यासोबत देखील बिर्याणी खाता येईल. बिर्याणी पूर्ण भारतातील लोकप्रिय डिश आहे. त्यामुळे मी आधी दिलेल्या उत्तरासाठी माफी मागतो.

हेही वाचा: Buying a used smartphone: जुना फोन खरेदी करताय? 'या' गोष्टी तपासा, अन्यथा होईल नुकसान

दरम्यान, Open AI ने ChatGPT ला नोव्हेंबर २०२२ मध्ये लाँच केले होते. मायक्रोसॉफ्टने देखील Open AI मध्ये १ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. आपल्या प्रोडक्ट्समध्ये ChatGPT ला एम्बेड करण्याची देखील कंपनीची योजना आहे.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT