Chat GPT esakal
विज्ञान-तंत्र

Chat GPT :आता Chat GPT म्हणणार रामराम पावणं, कसं काय! लवकरच सुरू होणार ही सुविधा

नेमकं काय आहे GPT?

Pooja Karande-Kadam

ChatGPT : चॅट जीपीटी हल्ली सगळीकडे फार चर्चेत आहे. हा शब्द तुम्ही गेल्या काही दिवसांत अनेक वेळा ऐकला असेल. तेव्हा हा शब्द तुम्हाला ते AI शी संबंधित असल्याचे समजले असेल, तर चला सोप्या शब्दात समजावून सांगूया. चॅट हे जीपीटी भाषेवर आधारित मॉडेल आहे.

यावर काहीही विचारल्यास ते तुमच्याशी अगदी माणसासारखे बोलेल, त्याच्याशी बोलून तुम्हाला असे वाटेल की तुम्ही रोबोट नाही तर माणसाशी बोलत आहात. हे मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे.

नेमकं काय आहे GPT?

GPT हे AI चॅट बॉट प्रमाणे आहे. याला ऑनलाइन कस्टमर केअरसाठी बनवण्यात आलंय.हे आधीच अशा प्रकारे प्रशिक्षित केले गेले आहे की यात एकावेळी अनेक भाषा समजण्याची प्रक्रिया समजली जाऊ शकते.

चॅट GPT ची वैशिष्ट्ये

यात सगळ्यात महत्वाचं फिचर म्हणजे मानवास रिस्पाँड करणे. त्यामुळे हे चॅटबॉट्स, AI सिस्टिम कन्वरसेशन आणि वर्चुअल असिस्टंटसाठी बेस्ट आहे. GPT हे अगदी मानवासोबत संभाषण करत असल्याप्रमाणेच तुमच्याशी भाष्य करते.

विशेष म्हणजे मानवास रिस्पाँड करणे, स्टोरीज लिहीणे. कविता लिहीणे, कोड लिहीणे, आर्टिकल्स लिहीणे, ट्रान्सलेशन करणे इत्यादी कामे तुम्ही यातून करू शकता.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओपन एआयने चॅट जीपीटी सुरू केले. अवघ्या आठवडाभरात हा चॅटबॉट जगभरात लोकप्रिय झाला आणि आज तो अनेक उत्पादने आणि सेवांमध्ये समाकलित करण्यात आला आहे.

दरम्यान, चॅटबॉटशी संबंधित अपडेट असे आहे की, आता तो तुम्हाला स्थानिक भाषांमध्येही रिप्लाय देऊ शकतो. याचा फायदा असा होईल की तुम्हाला प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रादेशिक भाषेत जाणून घेता येतील. सध्या, चॅट जीपीटी केवळ काही स्थानिक भाषांचे समर्थन करते.

तुमच्या भाषेत उत्तर कसे मिळवायचे

  1. सर्वप्रथम, जीपीटी चॅट करण्यासाठी लॉगिन करा. जर तुम्ही पहिल्यांदाच हे करत असाल तर आधी नोंदणी करा.

  2. मग सर्च बारमध्ये हिंदी, इंग्रजी, बंगाली किंवा भोजपुरीभाषेत तुमचा प्रश्न लिहा.

  3. इंटर दाबताच चॅटबॉट तुम्हाला स्थानिक भाषेत उत्तर देण्यास सुरवात करेल.

  4. आम्ही प्रत्यक्ष चेक इन केलं तेव्हा चॅटबॉट हिंदी, बंगाली आणि भोजपुरीभाषेत प्रतिसाद देत होता.

आपण रिअल-टाइम माहिती जाणून घेऊ शकता

चॅट जीपीटी प्लस सबस्क्रायबर्सला आता रिअल टाइम माहितीही कळणार आहे. यासाठी त्यांना आयओएस अॅपच्या आत मॉडेल स्विच करावे लागेल आणि ते जीपीटी-4 आणि बिंगसह ब्राउझिंग निवडून रिअल टाइम माहिती मिळवू शकतात.

जीपीटी-3.5 मॉडेल केवळ 2021 पर्यंत डेटा प्रदान करू शकते कारण त्याला आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यानंतर जेव्हा तुम्ही माहिती सर्च कराल तेव्हा ते तुम्हाला चुकीचं उत्तर देईल.

अँड्रॉइड अॅपची लोक वाट पाहत आहेत

ओपन एआयने आयओएससाठी चॅट जीपीटी अॅप जारी केले आहे. सुरुवातीला हे अमेरिकेत लाँच करण्यात आले होते, जे हळूहळू सर्वत्र रोलआउट करण्यात आले. हे अॅप भारतातील आयओएस युजर्ससाठीही उपलब्ध आहे.

मात्र, कंपनीने अद्याप अँड्रॉइडसाठी अ ॅप्लिकेशन जारी केलेले नाही. अँड्रॉइड युजर्स याची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण सध्या त्यांना चॅट जीपीटीमध्ये प्रवेश करण्यासाठी वेबचा आधार घ्यावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT