चॅटजीपीटीच्या शेअरिंग फीचरमुळे खाजगी संभाषणे गुगल सर्चवर लीक झाली.
मानसिक आरोग्य, करिअर यासारख्या संवेदनशील विषयांवरील चॅट्स गुगलवर दिसत आहेत.
ओपनएआयने फीचर काढून टाकले असून वापरकर्त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
चॅटजीपीटी एआयच्या जगात लोकप्रिय आहे. आपल्या रोजच्या जीवनातला महत्वाचा सोबती जो आपल्याला हवी ती माहिती देतो आणि मदत करतो. पण जर तुम्ही चॅटजीपीटी सोबत सतत संवाद साधत असाल आणि विशेष म्हणजे वैयक्तिक संवाद, तर ही तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. कारण चॅटजीपीटीच्या वापरकर्त्यांच्या खाजगी संभाषणांचा डेटा गुगल सर्चवर उघड झाला आहे. हो, तुम्ही बरोबर वाचले आहे. पण हे नेमके झाले कसे जाणून घेऊया..
मानसिक आरोग्य, करिअर सल्ला, लैंगिक जीवन, व्यसन अशा संवेदनशील विषयांवरील चॅट्स गुगलवर सहज शोधता येत आहेत. यामागचे कारण आहे चॅटजीपीटीचे एक खास फीचर, जे संभाषण शेअर करण्यासाठी लिंक तयार करते. ही लिंक फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इंस्टाग्रामवर शेअर केल्यास ती गुगलवर इंडेक्स होते आणि कोणालाही दिसू शकते.या लीकमुळे वापरकर्त्यांमध्ये चिंता पसरली आहे. विशेषतः, ज्या चॅट्समध्ये नावे किंवा वैयक्तिक माहिती आहे, ती देखील गुगलवर दिसण्याची शक्यता आहे. तथापि, ओपनएआयने स्पष्ट केले की, ही चूक जाणीवपूर्वक नव्हती.
हे फीचर एक प्रयोग होता आणि आता ते काढून टाकण्यात आले आहे. कंपनीने वापरकर्त्यांना इन्कॉग्निटो मोड वापरण्याचा किंवा शेअरिंगसाठी कॉपी-पेस्ट पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.वापरकर्त्यांनी आता अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमचे संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी लिंक शेअरिंग टाळा आणि खाजगी माहिती टाकण्यापूर्वी विचार करा.
Why were ChatGPT conversations visible on Google?
चॅटजीपीटीवरील संभाषणे गुगलवर का दिसली?
चॅटजीपीटीच्या शेअरिंग फीचरमुळे तयार झालेल्या लिंक्स गुगलवर इंडेक्स झाल्या, त्यामुळे संभाषणे दिसू लागली.
Are all ChatGPT conversations publicly available?
चॅटजीपीटीवरील सर्व संभाषणे सार्वजनिक आहेत का?
नाही, फक्त शेअर केलेल्या लिंक्सद्वारे संभाषणे गुगलवर दिसतात; सर्व चॅट्स सार्वजनिक नाहीत.
Does this leak include personal information?
या लीकमध्ये वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे का?
काही चॅट्समध्ये नावे किंवा वैयक्तिक तपशील असतील तर ते गुगलवर दिसू शकतात, पण बहुतांश चॅट्स सामान्य स्वरूपाच्या आहेत.
Has OpenAI addressed this issue?
ओपनएआयने या समस्येचे निराकरण केले आहे का?
होय, ओपनएआयने हे फीचर काढून टाकले आहे आणि हा एक प्रयोग होता असे सांगितले आहे.
How can users protect their ChatGPT conversations?
वापरकर्ते त्यांच्या चॅटजीपीटी संभाषणांचे संरक्षण कसे करू शकतात?
इन्कॉग्निटो मोड वापरा, लिंक शेअरिंग टाळा आणि कॉपी-पेस्ट पद्धतीने माहिती शेअर करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.