Electric Scooter sakal
विज्ञान-तंत्र

Electric Scooter : फक्त 6 पैशात 1 किमी धावणार 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा काय आहेत फीचर्स

एका स्मार्टफोन एवढी या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आहे

सकाळ डिजिटल टीम

वाढत्या प्रदूषणाच्या या जगात आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग येणार आहे, यात काही शंका नाही. पण पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने महाग असल्याने विजेवर चालणारी वाहने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. तुम्हालाही असे वाटत असेल तर तुमचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगत आहोत, ज्याला तुम्ही OnePlus 9RT 5G स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

हेही वाचा : सावरकरांविषयी प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात आणि बरंच काही!

पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, इव्होलेट पोनी ईझेड ही एक ICAT प्रमाणित ई-स्कूटर आहे, ज्यामध्ये वॉटरप्रूफ BLDC मोटर आहे जी 250 वॅट पॉवर प्रदान करते. रेंजबद्दल सांगायचे तर, ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर कमी स्पीडमध्ये 90-120 किमी धावू शकते. जर आपण किंमतीबद्दल सांगायचे तर 6 पैसे प्रति किमी दराने ही स्कूटर धावते. पोनी स्कूटरचे दोन प्रकार आहेत. एक लीड ऍसिड बॅटरीसह जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8-9 तास घेते, तर दुसरी लिथियम आयन बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 3-4 तास घेते. कलरच्या पर्यायाबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर व्हाईट, ब्लॅक, रेड, ब्लू आणि सिल्व्हर कलर मध्ये उपलब्ध आहे. स्पीडबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे.

कंपनी बॅटरीसह 1 वर्षाची आणि मोटरसह 18 महिन्यांची वॉरंटी देते. स्कूटरची लांबी 1750 मिमी, रुंदी 450 मिमी, सीटची उंची 800 मिमी, ग्राउंड क्लिअरन्स 180 मिमी, वजन 90 किलो आणि लोडिंग क्षमता 150 किलो आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Evolet Pony EZ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 41,124 रुपये आहे.

किंमतीची तुलना केल्यास OnePlus 9RT 5G च्या 12GB RAM 256GB स्टोरेज वेरिएंटशी केली, तर OnePlus फोनची किंमत 46,999 रुपये आहे, जी Evolet Pony EZ पेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT