JioPhone Next
JioPhone Next  RIL
विज्ञान-तंत्र

कधी लॉंच होणार JioPhone Next? काय असतील फीचर्स? वाचा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

डेडलाईनवर लॉन्च करण्यात अयशस्वी झाल्यानंतर जिओफोन नेक्स्टचा वाट पाहाणाऱ्या संपूर्ण देशातील ग्राहकांना Reliance कंपनीने निराश केले. हा स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती, काही कारणांमुळे मुहूर्त हूकला. JioPhone Next च्या किंमतीमुळे या स्मार्टफोनची अनेकजण आतुरतेने वाट बघत आहेत. हा स्मार्टफोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान JioPhone नेक्स्टचे लॉन्च दिवाळीला होणे अपेक्षित आहे, परंतु अद्याप लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही.

रिलायन्स जिओच्या निवेदनानुसार, जिओफोन नेक्स्ट दिवाळीच्या अगोदर लॉंच केला जाणार आहे, त्याने 'मेकिंग ऑफ जिओफोन नेक्स्ट' व्हिडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) लाँच करण्यामागील व्हिजन आणि कल्पनेबद्दल लहान माहिती देण्यात आली आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी Diwali 2021 चा सण ग्राहकांसाठी खास बनवण्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी आपला हा बजेट स्मार्टफोन बाजारात लॉंच करेल.

JioPhone Next

Jio ने म्हटले आहे की, JioPhone Next मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया आणि मेड बाय इंडियन्स आहे. JioPhone नेक्स्ट प्रत्येक भारतीयाला समान संधी आणि टेक्नोलॉजी देण्याचे वचन देतो. थोडक्यात, JioPhone Next मुळे लाखो भारतीयांचे आयुष्य कसे बदलण्याची अपेक्षा कंपनीला आहे हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की

JioPhone Next चे फीचर्स

कंपनीच्या या JioPhone Next स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर पॉवर देईल हे जिओने अद्याप अधिकृतपणे उघड केलेले नाही, परंतु कंपनीचे म्हणणे आहे की, चिपसेट क्वालकॉमद्वारे तयार केले जाईल. चिपसेट ऑडिओ, परफॉर्मन्स आणि बॅटरी लाइफमध्ये ऑप्टिमायझेशनसह येईल. डिव्हाइसला नवीन फीचर्स आणि सेक्युरिटी अपडेटसह ऑटोमॅटीक सॉफ्टवेअर अपडेट मिळेल.

JioPhone Next हा गुगल अँड्रॉइडच्या भागीदारीत तयार करण्यात आला असून यामध्ये देण्यात आलेल्या ऑपरेटिंग सिस्टमला Pragati OS असे म्हटले जाईल. प्रगती ओएसला Android चा सपोर्ट देण्यात आला असून, ही एक जागतिक दर्जाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही विशेषतः भारतासाठी तयार केली गेली आहे असे कंपनीने म्हटले आहे. या डिव्हाईसमध्ये वापरकर्त्यांना Google आणि Jio च्या अॅप्स देण्यात येतील, तर इतर अॅप्ससाठी Google Play Store देण्यात येईल.

कॅमेरा फीचर्स

JioPhone Next फोनच्या कॅमेरा फीचर्सबद्दल माहिती अद्याप उघड झाली नाही, परंतु या स्वस्त डिव्हाइसमध्ये फोटोसाठी बिल्ट-इन पोर्ट्रेट मोड सारखे फीचर्स असलेला कॅमेरा देण्यात येईल. हा कॅमेरा कमी प्रकाशात फोटो काढण्यासाठी यात नाईट मोड आणि भारतीय सणांसाठी खास एआर (augmented reality) फिल्टर देखील देण्यात येईल.

JioPhone Next Assistant

JioPhone Next फोन व्हॉइस असिस्टंटसह देण्यात येईल जे वापरकर्त्यांना त्यांच्या स्क्रीनवर काय आहे याबद्दल माहिती ऍक्सेस करण्यास, अॅप्स लॉन्च करण्यास, विविध सेटिंग्ज बदलण्यास आणि वेबवरून localised content मिळविण्यास मदत करेल. डिव्हाइसमध्ये कोणतीही भाषेतील माहिती वापरकर्त्यांच्या पसंतीच्या भाषेत ट्रांन्सलेट करण्याची क्षमता देखील असेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT