Airtel  
विज्ञान-तंत्र

एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! मिळतो 3GB डेटा अन् फ्री कॉलिंग

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन हा 58 रुपयांच्या डेटा व्हाउचरच्या स्वरूपात येतो, ज्यामध्ये 3GB डेटा ऑफर केला जातो. चला जाणून घेऊया Airtel च्या आणखी स्वस्त प्लॅन्सबद्दल ज्यामध्ये डेटा, कॉल, SMS सारखे अनेक बेनिफिट्स दिले जातात

एअरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन

गेल्या वर्षी प्रीपेड दरवाढीनंतर 79 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 99 रुपयांवर गेली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 200 MB डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम, 1 पैसे दराने कॉल्स मिळतात. स्थानिक एसएमएस, प्रति सेकंद 1 रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपया आकारला जातो. 99 रुपयांचा प्लॅन एकूण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. भारतात उपलब्ध असलेला हा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे जो व्हॉईस कॉलिंग आणि डेटा तसेच SMS बेनिफिट्स देखील देतो.

एअरटेलचा 50 रुपयांचा कोणताही रिचार्ज प्लॅन नाही. परंतु तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत डेटा व्हाउचर मिळवू शकता. मात्र जर तुमच्याकडे एक्टिव बेस्ड प्रीपेड प्लॅन असेल तरच डेटा व्हाउचर काम करतात. एअरटेल डेटा व्हाउचर 58 रुपयांपासून सुरू होतात, जे वापरकर्त्यांना 3GB डेटा देतात. त्यानंतर 98 रुपयांचा प्लॅन आहे जो ग्राहकांना विंक म्युझिक प्रीमियम बेनिफिट्ससह 5GB डेटा ऑफर करतो. दोन्ही प्लॅनची वैधता सुरु असलेल्या प्रीपेड प्लॅनसारखीच आहे. एअरटेलचा 49 रुपयांचा पॅक 2021 मध्ये वगळण्यात आला. कंपनीने 49 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे जेणेकरून वापरकर्ते पुढील सर्वात स्वस्त पर्याय 79 रुपयांचा रिचार्ज करू शकतील. आता या प्लॅनसाठी यूजर्सना ९९ रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT