income tax sakal
विज्ञान-तंत्र

Income Tax Return मुदतीपूर्वी भरा, होणार 'हे' फायदे

आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

सकाळ डिजिटल टीम

आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न(ITR) फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. अनेकदा असे दिसून येते की अनेकजण आयटीआर फाईल करण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहतात.

अशावेळी त्यांच्याकडून अनेकदा चुकाही होतात. कारण शेवटच्या क्षणी गर्दी खुप वाढते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आयटीआर दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट पाहू नये आणि शक्य तितक्या लवकर आयटीआर भरावा. (Check here benefits of filing income tax return before deadline)

तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी इनकम टॅक्स रिटर्न भरू शकता. विशेष म्हणजे लवकर दाखल करणाऱ्यांना लवकर रिफंड मिळतो आणि ते वेगवेगळ्या विभागांतर्गत अतिरिक्त व्याजपासून वाचू शकतात.

तज्ञांचे काय मत आहे?

Tax2win चे सह-संस्थापक आणि CEO अभिषेक सोनी म्हणतात, “आयटीआर भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. लवकरात लवकर रिफंड मिळविण्यासाठी आणि 234A, B&C आणि उशीरा फाइलिंग फी U/S 234F अंतर्गत लावण्यात येणारे व्याजपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर ITR दाखल करावा.

जर कोणत्याही कारणास्तव अंतिम मुदतीपूर्वी ITR भरण्यात अयशस्वी झाल्यास, तर लागू करावर दरमहा 1% अतिरिक्त व्याज द्यावे लागेल.

Taxbuddyचे फाउंडर सुजीत बांगर म्हणतात, “जेव्हा आयकर रिटर्न फाईल करण्यात येते तेव्हा ती लवकर केलेली उत्तम असते. कधीही आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी लास्ट डेटची वाट पाहू नये. लास्ट डेटला खुप समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

उदाहरण, साइट क्रॅश होणे, टॅक्स पेमेंट संबंधीत समस्या असणे. ते पुढे म्हणतात की जर या समस्येंमुळे आईटीआर फाइल होऊ शकत नसेल तर तुम्हाला याचा मोठा परिणाम भोगावा लागेल.

फॉर्म 26AS मध्ये पूर्ण TDS दिसत नसल्यास, काही काळ वाट पहावी.किंवा अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर फाइल करावा. बांगर म्हणाले, अशी काही उदाहरणे आहेत जिथे 26AS अजूनही पुर्ण TDS दाखवत नाही. अशा परिस्थितीत आपण थोडा वेळ थांबून डिडक्टर कडे जावे. TDS फॉर्म 26AS मध्ये अपडेट झाल्यानंतर तुम्ही 31 जुलैपूर्वी फाईल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census 2027: मोठी बातमी! जनगणनेच्या वेळापत्रकाची घोषणा; 'या' तारखांना होणार सर्वेक्षण, काही भाग तात्पुरते वगळले; 'हे' प्रश्न विचारले जाणार

FDA Action : कालबाह्य अन्नपदार्थांची तारखांमध्‍ये छेडछाड करून पुनर्विक्री; एफडीएकडून नवीन राज्यस्तरीय आदेश लागू

Marathi News Live Updates : लासलगाव परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; एकाएकी मुसळधार बरसल्याने नागरिकांची तारांबळ!

Offline Admission : ‘ऑफलाइन’ प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना दंड, विद्यार्थ्यांना दिलासा

Container Accident : शिवना नदीच्या पुलावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी! पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT