China Hackers
China Hackers eSakal
विज्ञान-तंत्र

China Hackers : भारतातील निवडणुकांमध्ये खोडा घालण्यासाठी चीन करणार 'एआय'चा वापर, हॅकर्सची फौज सज्ज! रिपोर्टमध्ये दावा

Sudesh

Lok Sabha Election China Influence : भारतात या महिन्यापासूनच लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठीचा प्रचार सुरू असतानाच, एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या निवडणुकीदरम्यान चीन एआय टूल्सच्या मदतीने मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतं, असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. 'सेम टार्गेट्स न्यू प्लेबुक्स : इस्ट एशिया थ्रेट अ‍ॅक्टर्स एम्प्लॉय युनिक मेथड्स' नावाच्या रिपोर्टमध्ये कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.

चिनी हॅकर्स एआयच्या मदतीने निवडणुकांमध्ये खोडा घालणार असा इशारा यापूर्वी देखील सरकारला मिळाला होता. आता मायक्रोसॉफ्टने देखील अशाच प्रकारची माहिती आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये यावर्षी निवडणुका होत आहेत. यामध्ये चीन आपल्या फायद्यासाठी एआय जनरेटेड कंटेंट आणि टूल्सचा वापर करु शकतो.

कशा प्रकारे पडणार प्रभाव?

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, चीनने यापूर्वी देखील असे प्रयत्न केले आहेत. चिनी हॅकर्स एआय टूल्सच्या मदतीने डीपफेक व्हिडिओ तयार करू शकतात, तसंच सोशल मीडियावर फेक अकाउंट्सच्या मदतीने अपप्रचार करण्याचं कामही ते करू शकतात. प्रसिद्ध नेत्यांचा आवाज क्लोन करुन, बदनामीकारक कंटेंट तयार केला जाऊ शकतो. हा कंटेंट व्हायरल झाल्यास कोट्यवधी नागरिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे.

तैवानच्या निवडणुकांमध्ये वापर

कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे, की चीनने तैवानमधील प्रेसिडेन्शिअल इलेक्शनवेळी या पद्धतीचा वापर केला होता. एखाद्या देशाने दुसऱ्या देशातील निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी एआयचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. जानेवारी 2024 मध्ये या निवडणुका पार पडल्या. या दरम्यान चीनने मीम्स, एआय व्हिडिओ आणि डीपफेक ऑडिओंच्या मदतीने मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT