Citroen C3 Aircross Automatic eSakal
विज्ञान-तंत्र

Citroen C3 Aircross Automatic : 'सिट्रॉन'ने खास भारतीयांसाठी लाँच केली नवी ऑटोमॅटिक एसयूव्ही; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Citroen SUV : ही मध्यम आकाराची एसयूव्ही भारतीयांसाठी अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक कार असल्यामुळे शहरांमध्ये, ट्रॅफिकमध्ये देखील ही कार अगदी आरामात चालवू शकणार आहात.

Sudesh

Citroen C3 Aircross Automatic SUV Price : फ्रेंच वाहन निर्मिती कंपनी 'सिट्रॉन'ने भारतात आपल्या C3 Aircross एसयूव्ही कारचं ऑटोमॅटिक मॉडेल लाँच केलं आहे. ही कार भारतातील ग्राहकांना लक्षात घेऊन व स्थानिक वातावरणाला साजेशा पद्धतीने विकसित व उत्पादित करण्यात आली आहे. या गाडीच्या मॅन्युअल मॉडेलची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते, तर ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 12,84,000 रुपयांपासून सुरू होत आहे.

ही मध्यम आकाराची एसयूव्ही भारतीयांसाठी अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक कार असल्यामुळे शहरांमध्ये, ट्रॅफिकमध्ये देखील ही कार अगदी आरामात चालवू शकणार आहात. या कारचं मायलेज देखील इतर ऑटोमॅटिक एसयूव्हींच्या तुलनेत अगदीच चांगलं आहे. ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये १७.६ किलोमीटर अंतर कापेल, असा दावा कंपनीने केला आहे. (Citroen C3 Aircross Automatic Mileage)

फीचर्स

या कारमध्ये ‘सिट्रॉन कनेक्ट’ हे फिचर देण्यात आले असून, त्यात रिमोट इंजिन स्टार्ट, रिमोट एसी प्री-कंडिशनिंग असे विविध ४० स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. ही भारतातील पहिली मिड साईज एसयूव्ही आहे ज्यामध्ये 5+2 फ्लेक्सी प्रो सीटिंग मिळते, असंही कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटलं आहे. यामध्ये सेफ्टीसाठी ड्युअल एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, एबीएस आणि इतर फीचर्स दिले आहेत. (Citroen C3 Aircross Automatic features)

ही कार देशातील ५३ शहरांतील ५८ शोरूममध्ये सध्या उपलब्ध आहे. यासंदर्भात कंपनीने व्यवस्थापकीय संचालक आदित्य जयराज म्हणाले, ‘‘आम्ही नावीन्यता, कामगिरी व किंमत हे तीन निकष एकत्र करीत भारतीयांसाठी ही कार सादर केली आहे. सी३ एअरक्रॉस वाहन चालवण्याच्या अनुभव, वैविध्य व आराम शोधणाऱ्या ग्राहकांसाठी पर्वणी ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.’’ ही गाडी पुण्यात दाखल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT