विज्ञान-तंत्र

छोटा पिन - टाईप C चार्जरवरून होणारी भांडणे मिटवणारा Common Charger कधी येणार ?

नवीन नियमांनुसार, USB-C टाईपचा चार्जर सर्व मोबाइलसाठी कॉमन चार्जर असेल.

सकाळ डिजिटल टीम

Common Charger for Mobile : तुम्ही बाहेर जाताना कधी चार्जर विसरलात का? अशावेळी फोनची बॅटरी डाऊन झाल्यावर फोन कसा चार्ज करावा हा मोठा प्रश्न असतो. आता या प्रश्नावर तोडगा म्हणून सर्व मोबाईल्सला common charger लागणार असा नियम काढला आहे.

चार्जरबाबत मोबाईल कंपन्यांची मनमानी आता संपणार आहे. युरोपमध्ये आता मोबाइल कंपन्यांना सर्व स्मार्टफोनसाठी कॉमन चार्जरचा नियम पाळावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार, USB-C टाईपचा चार्जर सर्व मोबाइलसाठी कॉमन चार्जर असेल. भारतात सध्या हा नियम लागू झालेला नाही.

नियम कधी होणार लागू

2024 च्या अखेरपर्यंत सर्वा स्मार्टफोन, टॅबलेट्स आणि कॅमेरामध्ये USB-C चार्जिंग पोर्ट दिला जाईल. या संदर्भात युरोप संसदेने एक नियम पारित केला आहे. कॉमन चार्जरच्या बाजूने 602 मतं पडली तर विरोधात फक्त 13 मतं पडली.

याचा सर्वाधिक परिणाम ॲपल फोनवरही (apple phone) होणार आहे. ॲपल कंपनीचा सामान्य चार्जर नियमाला विरोध आहे. कंपनी सध्या आयफोनसाठी लाइटनिंग पोर्ट देते. तर बहुतेक मोबाईल कंपन्या USB-C पोर्ट वापरतात.

भारतातही लवकरच नियम

कॉमन चार्जरचा नियम भारतात आणण्याचीही चर्चा सुरू आहे. भारत सुरुवातीला दोन प्रकारच्या चार्जरला मान्यता देण्याचा विचार करत आहे. कारण, देशात कॉमन चार्जर नियम लागू करणे कठीण होऊ शकते असं ग्राहक व्यवहार सचिवांचं म्हणणं आहे. यासंदर्भात भारतातील तज्ज्ञ लोकांची चर्चा सुरू आहे. यात पहिलं पोर्ट सी-टाईप (C Type Charger) असेल. दुसऱ्या पोर्टबाबत चर्चा सुरु आहे. युरोपमधील सर्व उपकरणांसाठी टाइप-सी चार्जिंग पोर्ट उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT