cyberx9 claim data 20 million postpaid customers of vodafone idea exposed  
विज्ञान-तंत्र

व्होडाफोन-आयडियाच्या कोट्यवधी ग्राहकांचा कॉल डेटा सार्वजनिक! कंपनी म्हणते...

सकाळ डिजिटल टीम

सायबर सिक्युरिटी रिसर्च कंपनी CyberX9 ने एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे हे की टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोन आयडियाच्या सिस्टममधील त्रुटींमुळे सुमारे 20 दशलक्ष पोस्टपेड ग्राहकांचा कॉल डेटा रेकॉर्ड सार्वजनिक झाला आहेत. मात्र, कंपनीने या दाव्याला नकार दिला असून असे कुठल्याही प्रकरचा डेटा लिक झाला नसल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बिलिंग सिस्टीममधील त्रुटी लक्षात येताच त्या दूर करण्यात आल्या.

यापूर्वी, सायबरएक्स 9 च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की व्होडाफोन आयडियाच्या सुमारे 20 दशलक्ष पोस्टपेड ग्राहकांचे कॉल डेटा रेकॉर्ड सिस्टमिक त्रुटींमुळे लीक झाला. यात कॉलची वेळ, कॉलचा कालावधी, कॉल कोठून केला गेला, ग्राहकाचे पूर्ण नाव आणि पत्ता, एसएमएस तपशील आणि संदेश ज्यांना पाठवले गेले होते ते संपर्क क्रमांक देखील उघड झाल्याचे म्हटले आहे. सायबरएक्स 9 चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हिमांशू पाठक यांनी पीटीआयला सांगितले की कंपनीने व्होडाफोन आयडियाला याबद्दल माहिती दिली होती आणि कंपनीच्या अधिकाऱ्याने 24 ऑगस्ट रोजी अशी समस्या असल्याचे मान्य केले होते.

यावर व्होडाफोन आयडियाने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, रिपोर्टमध्ये डेटा लीकचा उल्लेख आहे पण तसे झाले नाही. हा रिपोर्ट खोटा आणि दुर्भावनापूर्ण आहे. कंपनीकडे एक मजबूत IT सुरक्षेसंबंधी पायाभूत सुविधा आहेत ज्या आमच्या ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवते. तसेच आम्ही नियमित तपासणी करतो आणि आमचे सुरक्षा आर्किटेक्चर आणखी मजबूत करतो. बिलिंगमधील संभाव्य दोष शोधून काढण्यात आले आणि ताबडतोब दुरुस्त करण्यात आले आहेत. कोणत्याही डेटा लीक शोधण्यासाठी फॉरेन्सिक विश्लेषण देखील केले गेले. दरम्यान CyberX9 चे म्हणणे आहे की कंपनीने लाखो ग्राहकांचा किमान दोन वर्षांचा कॉल डेटा आणि इतर संवेदनशील डेटा सार्वजनिक केला आहे आणि अनेक गुन्हेगार हॅकर्सनी तो डेटा चोरला असावा. तसेच फॉरेंसिक ऑडिट केले असल्याचे तसेच डेटा लीक न झाल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT