Developed indigenous mobile operating system BHAROS developed IIT Madras sakal
विज्ञान-तंत्र

BHAROS : स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम तयार

आयआयटी मद्रासकडून ‘भारोस’ विकसित

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आयआयटी मद्रासने नाविन्यतेच्या कल्पनेखाली (इनक्युबेटेड फर्म) स्थापन केलेल्या कंपनीने भारोस (बीएचएआरओएस) ही स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली आहे. ही सिस्टिम व्यावसायिक वापरासाठीच्या ‘ऑफ दि शेल्फ हॅंडसेट’मध्ये इन्स्टॉल करता येऊ शकते.

ज्या कंपन्या आणि संघटनांचे सुरक्षा आणि गोपनियताविषयक धोरण कठोर आहे अशांना ‘भारोस’च्या माध्यमातून सेवा पुरविण्यात येते. काही मोजके ॲप आणि मोबाईलच्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहितीची देवाणघेवाण होत असते अशा वापरासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशा यूजरना फाइव्ह-जी नेटवर्कच्या माध्यमातून खासगी क्लाऊड सेवांचा अॅक्सेस हवा असतो.

आयआयटी मद्रासच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘जेएएनडीके ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ (जेएएनडीकेओपीएस) या कंपनीने ‘भारोस’ ही यंत्रणा विकसित केली आहे. याबाबत बोलताना आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी म्हणाले की, ‘‘ विश्वासाच्या पायावर या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमची उभारणी करण्यात आली असून यूजरना अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण देण्याबरोबरच त्यांना ती सहज वापरता यावी अशीच तिची रचना करण्यात आली आहे. अॅपच्या गरजा लक्षात घेऊन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.’’

सेवेची व्याप्ती आणखी वाढणार

यूजरची सुरक्षा आणि गोपनीयतेला या यंत्रणेमुळे एक नवी कलाटणी मिळेल. भविष्यामध्ये आम्हाला अनेक खासगी उद्योग, सरकारी संस्था, रणनीती आखणाऱ्या संस्था आणि दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आदींसोबत काम करायचे आहे. यामुळे ‘भारोस’ची व्याप्ती आणखी वाढेल. ‘भारोस’मध्ये नो डिफॉल्ट अॅपचा (एनडीए) समावेश असून त्यामुळे यूजरना ज्या अॅपचा परिचय नाही किंवा ज्याच्यावर त्यांचा विश्वास नाही अशा अॅपच्या वापराची बळजबरी करता येणार नाही.

अॅपवर यूजरचे अधिक नियंत्रण

या प्रणालीमुळे यूजरच्या डिव्हाइसमधील अॅपवर त्यांचे अधिक नियंत्रण प्रस्थापित होईल. यूजरना ज्या अॅपवर विश्वास आहे अशांचाच ते वापर करू शकतील. तसेच डिव्हाईसमधील जे फिचर आणि डेटाचा अॅक्सेस अॅपला असावा असे त्यांना वाटते त्याचा अॅक्सेस त्यांना उपलब्ध करून देता येईल. ‘भारोस’च्या माध्यमातून नेटिव्ह ओव्हर दि एअर (नोटा) हे अपडेट उपलब्ध करून दिले जाणार असून त्यामुळे यूजरचे डिव्हाईस सुरक्षित राहू शकेल.

अभेद्य सुरक्षा कवच

‘नोटा’ हे आपोआप अपडेट होईल तसेच ते डाऊनलोड आणि इन्स्टॉल देखील होऊ शकेल. यासाठी यूजरला स्वतःहून काही प्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. यूजरचे डिव्हाईस ऑपरेटिंग सिस्टिमच्या लेटेस्ट व्हर्जनवर काम करेल. त्यामध्ये सिक्युरिटी पॅचेस आणि बग फिक्सेसचा समावेश असेल. एनडीए, पीएएसएस आणि नोटासारख्या घटकांमुळे ‘भारोस’ यूजरच्या विश्वासाला पात्र ठरेल असे संशोधकांनी म्हटले आहे. प्रायव्हेट अॅप स्टोअर सर्व्हिसेसच्या (पीएएसएस) यूजरला विश्वासार्ह अॅप उपलब्ध होऊ शकतात. यामुळे यूजरला पूर्णपणे सुरक्षित अॅपच वापरासाठी उपलब्ध होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT