mercedes
mercedes Sakal
विज्ञान-तंत्र

Mercedes-Benz: फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर चालवलेल्या २ कोटींच्या गाडीत काय आहे खास? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Mercedes-Benz G350d Details: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा’ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली. मात्र, दौऱ्यादरम्यान स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेली गाडी चर्चेचा विषय ठरला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीच स्टेअरिंग स्वतः फडणवीसांनी हाती घेतल्याने याची विशेष चर्चा सुरू आहे. या दौऱ्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चालवलेली गाडी देखील लाखमोलाची आहे. देवेंद्र फडणवीस हे Mercedes-Benz G350d चालवताना दिसत आहेत. फडणवीसांनी स्वतः जवळपास ५०० किमी गाडी चालवली. Mercedes-Benz G350d या लग्झरी एसयूव्हीमध्ये काय खास आहेत, ते जाणून घेऊया.

हेही वाचा: Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

पॉवरफुल इंजिनसह येते Mercedes-Benz G350d

Mercedes-Benz G350d एसयूव्ही पॉवरफुल इंजिनसह येते. यामध्ये ३.० लिटरचे ६ सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. इंजिन १२००-३२०० आरपीएमवर ६००एनएम टॉर्क आणि ३४००-४६०० आरपीएमएवर २८१.६ पॉवर जनरेट करते. विशेष म्हणजे ही एसयूव्ही अवघ्या ७.४ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडू शकते. तर याचा बूट स्पेस ४८० लीटर आहे.

एसयूव्हीमध्ये थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, ९ एअरबॅग्ज, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखे अनेक शानदार फीचर्स देखील पाहायला मिळतील. एसयूव्हीमध्ये ५ जण सहज बसू शकतात. यात १२.३ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. यात तुम्हाला Android Auto, Apple CarPlay ची देखील सुविधा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी इतरही अनेक फीचर्स दिले आहेत.

Mercedes-Benz G350d ची किंमत

Mercedes-Benz G350d एसयूव्हीची किंमत देखील जास्त आहे. मर्सिडीजच्या या लग्झरी एसयूव्हीची ऑन रोड किंमत जवळपास २.६ कोटी रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT