Poco Smartphone
Poco Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: १२०० रुपयात मिळतोय ६४MP कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन, ऑफर २१ डिसेंबरपर्यंतच; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Offer On Poco M4 Pro Smartphone: स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डे सेलमध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. सेलमध्ये Poco M4 Pro ला तुम्ही आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करू शकता.

२१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये १७,९९९ रुपये किंमतीचा Poco M4 Pro स्मार्टफोन फक्त १०,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Poco M4 Pro स्मार्टफोन वर मिळेल बंपर ऑफर

फ्लिपकार्ट सेलमध्ये पोकोचा हा स्मार्टफोन बंपर डिस्काउंटनंतर फक्त १०,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, कोटक बँक अथवा एसबीआयच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ७५० रुपये इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. फोनवर ९,८०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास पोको एम४ प्रो स्मार्टफोनला अवघ्या १,१९९ रुपयात खरेदी करता येईल.

Poco M4 Pro चे फीचर्स

Poco M4 Pro स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज, टच सँपलिंग रेट १८० हर्ट्ज आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल २०४८ निट्स आहे. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी प्र्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोन मीडियाटेक हीलियो जी९६ चिपसेटसह येतो.

फोटोग्राफीसाठी यात रियरला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि AI फेस अनलॉकसह येणाऱ्या या फोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. बॅटरी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोन अँड्राइड ११ आधारित MIUI १३ वर काम करतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी देखील शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Lava Smartphone: अवघ्या ७ हजारात आला भारतीय कंपनीचा दमदार स्मार्टफोन, खरेदीवर ३ हजारांचे बड्स एकदम फ्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT