D2M Technology
D2M Technology sakal
विज्ञान-तंत्र

OTT युजर्ससाठी गुड न्यूज! आता एकही पैसा खर्च न करता बातम्या, क्रिकेट अन् मुव्ही पहा

सकाळ डिजिटल टीम

दूरसंचार विभाग (DoT) आणि भारताच्या सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारती यांनी एक टेक्नोलॉजी आणली आहे ज्याद्वारे प्रत्येकाला आता अगदी कमी खर्चात आणि इंटरनेट डेटाशिवाय OTT प्लॅटफॉर्मचा लाभ मिळणार. (D2M technology)

डायरेक्ट-टू-मोबाइल ब्रॉडकास्टिंग (D2M) असे या टेक्नोलॉजीचे नाव आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, कोणत्याही डेटा कनेक्शनशिवाय, तुम्ही सर्व व्हिडिओ आणि मल्टीमीडिया प्लॅटफॉर्मचा आनंद थेट मोबाइलवर घेऊ शकता. (a technology that allows multimedia content to be sent straight to mobile phones without an internet connection.)

डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) टेक्नोलॉजी काय आहे?

डायरेक्ट-टू-मोबाइल ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी म्हणजे व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया कंटेट थेट तुम्हाला तुमच्या मोबाइलवर पाहता येणार. म्हणजेच इंटरनेट, केबल किंवा DTH शिवाय तुम्हाला मोबाईलमध्ये बातम्या, क्रिकेट, चित्रपट इत्यादी सर्व मनोरंजनाचा कंटेट, व्हिडिओ मोफत पाहण्याची सुविधा मिळणार. (do you know about D2M technology watch free news cricket and movies)

याशिवाय, इंटरनेटशिवाय तुमच्या मोबाइल फोनवर, हॉटस्टार, सोनी लाईव्ह, झी फाइव्ह, अॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्स सारख्या टॉप कंटेट, चित्रपटांसह मल्टीमीडिया कमी खर्चात बफरिंगशिवाय प्रत्येक घरापर्यंत सहज पोहोचतील.

या टेक्नोलॉजीला समजून घ्या

फोनमधील रिसिव्हर फ्रिक्वेन्सीद्वारे ज्या प्रमाणावर तुम्ही फोनवर एफएम रेडिओ ऐकता त्यात प्रत्येक चॅनेल ऐकण्याची सुविधा असते.त्याचप्रमाणे, D2M च्या मदतीने, मल्टीमीडिया कंटेट देखील फोनमध्ये थेट दिसणार.

या टेक्नोलॉजीचा लोकांना खूप फायदा होणार आहे. लोक इंटरनेटशिवाय व्हिडिओ ऑन डिमांड (VOD) किंवा OTT प्लॅटफॉर्मवरून मल्टीमीडिया कंटेटचा आनंद घेऊ शकता.

D2M टेक्नोलॉजीची गरज का आहे?

भारताचा दूरसंचार विभाग या टेक्नोलॉजीद्वारे नागरिकांना केंद्रबिंदू ठरवत त्या कंटेट थेट पुरवू शकतो आणि त्याचा वापर खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी, आपत्कालीन सूचना जारी करण्यासाठी किंवा आपत्ती व्यवस्थापन करताना मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय मोबाईल फोनवर थेट बातम्या, खेळ इत्यादी कंटेट पुरवणे सोपी जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT