Doogee S99  Sakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Smartphone: हातोड्यानेही फुटणार नाही 'हा' भन्नाट स्मार्टफोन, पाण्यातही वापरा; किंमत १५ हजारांच्या आत

Doogee S99 स्मार्टफोन लवकरच बाजारात लाँच होणार आहे. इतरांपेक्षा या फोनमध्ये हटके फीचर्स पाहायला मिळतील.

सकाळ डिजिटल टीम

Doogee S99 Launch Soon: Rugged Smartphone बनवणारी कंपनी Doogee लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात सादर करणार आहे. कंपनी Doogee S99 स्मार्टफोनला लाँच करणार आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी शानदार कॅमेरा मिळेल. फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल, यात मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा असेल. याशिवाय, ६४ मेगापिक्सलचा नाइट व्हिजन कॅमेरा देखील दिला जाईल. Doogee S99 च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

Doogee S99 ची किंमत

Doogee S99 स्मार्टफोन २२ डिसेंबरला जागतिक बाजारात लाँच होणार आहे. या फोनची किंमत ३२९ डॉलर आहे. परंतु, लाँच ऑफर अंतर्गत फक्त १७९ रुपयात खरेदी करता येईल. फोनचा पहिला सेल २३ डिसेंबरपर्यंत चालेल. हँडसेटला AliExperess आणि Doogeemall वरून खरेदी करू शकता.

Doogee S99 चे स्पेसिफिकेशन्स

Doogee S99 फोन इतरांपेक्षा हटके फीचर्ससह येतो. फोनमध्ये हाय-क्वालिटी कॅमेरा मिळेल. यात ६.३ इंच FHD+ वॉटरड्रॉप डिस्प्ले मिळेल. यात मीडियाटेक हीलियो जी९६ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. यात १५ जीबीपर्यंत रॅम (८ जीबी + ७ जीबी एक्सटेंडेड) आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता.

हेही वाचा: Smartphone Offer: iPhone ते Samsung... चक्क अर्ध्या किंमतीत मिळतायत बेस्टसेलर स्मार्टफोन, ऑफर घ्या जाणून

फोनमध्ये मिळेल पॉवरफुल बॅटरी

Doogee S99 मध्ये ३३ वॉट थंडर चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. विशेष म्हणजे फोनवर पाणी पडले तरी खराब होत नाही. हा हँडसेट पडल्यानंतरही फुटणार नाही. यासाठी फोनला आयपी६८ आणि आयपी६९के रेटिंग मिळाले. कनेक्टिव्हिटीसाठी देखील तुम्हाला अनेक शानदार फीचर्स यात मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Latest Marathi News Live Update : 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

Shukra Transit: २६ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहणार शुक्र; मेष, वृषभसह 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT