DRDO Humanoid Military Robot Project esakal
विज्ञान-तंत्र

DRDO Humanoid Military Robot : सैनिक नाही, तर पाकिस्तानशी लढणार रोबो?डीआरडीओचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प काय आहे? जाणून घ्या

DRDO Humanoid Military Robot Project : डीआरडीओकडून युद्धभूमीवर वापरण्यासाठी अत्याधुनिक यंत्रमानव तयार केला जात आहे. सैनिकांचा जीव धोक्यात न घालता लष्करी मोहिमा पार पाडण्यासाठी हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे.

Saisimran Ghashi

DRDO Humanoid Robot Project : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारताच्या लष्करी क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची चिन्हं आहेत. डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मधील शास्त्रज्ञ सध्या एका अत्याधुनिक 'ह्युमनॉइड' म्हणजेच मानवासारखा दिसणारा यंत्रमानव तयार करत आहेत. लष्करी मिशन्समध्ये सैनिकांचा जीव धोक्यात न घालता अत्यंत धोकादायक आणि क्लिष्ट मोहिमा पार पाडण्यासाठी हा यंत्रमानव वापरण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुण्यात सुरू आहे.

चार वर्षांपासून संशोधन सुरू

DRDO अंतर्गत कार्यरत रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (R&DE), इंजिनियर्स या प्रयोगशाळेमध्ये गेल्या चार वर्षांपासून या यंत्रमानवावर काम सुरू आहे. प्रकल्पाचे गट संचालक एस. ई. तलोळे यांनी सांगितले की, "यंत्रमानवाचा वरचा आणि खालचा भाग वेगळ्या प्रोटोटाईप्सद्वारे विकसित करण्यात आले असून काही मूलभूत कामगिरी यशस्वीपणे तपासण्यात आली आहे." या यंत्रमानवाने जंगलासारख्या कठीण भूभागावरही काम करू शकावे, असा उद्देश आहे.

या यंत्रमानवात मानवी स्नायूंप्रमाणे हालचाल करणारे अ‍ॅक्च्युएटर्स, विविध सेन्सर्स आणि तंत्रज्ञानिक नियंत्रण प्रणाली असे तीन मुख्य भाग असणार आहेत. यामुळे तो आजूबाजूचा डेटा गोळा करून तत्काळ कृती करू शकेल. यंत्रमानवाच्या दोन्ही हातांमध्ये एकूण 24 डिग्री ऑफ फ्रीडम (स्वतंत्र हालचाली) असणार आहेत ज्यामुळे तो वस्तू उचलणे, सरकवणे, ढकलणे अशा विविध कृती करू शकेल.

फीचर्स

विशेष म्हणजे दोन्ही हात एकत्रितपणे काम करत धोकादायक साहित्य जसे की स्फोटके, रासायनिक द्रव्ये किंवा मायन सुरक्षितरीत्या हाताळू शकतात. यंत्रमानव दिवस रात्री, घरामध्ये किंवा बाहेर, कोणत्याही हवामानात कार्यक्षमतेने काम करेल.

या यंत्रमानवामध्ये 'Simultaneous Localisation and Mapping (SLAM)' प्रणाली आहे, ज्याद्वारे तो स्वतःचा मार्ग ओळखून स्वयंचलितरित्या पुढे जाऊ शकेल. याशिवाय तो पडल्यावर पुन्हा उभा राहणे (fall recovery), ढकलल्यावर संतुलन राखणे (push recovery), तसेच स्वतःचे नकाशे तयार करून मार्ग आखणे अशा अत्याधुनिक कौशल्यांनी सुसज्ज आहे.

2027 पर्यंत प्रकल्पाचे लक्ष्य

प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून सध्या तो प्रगत टप्प्यात आहे. सीमांवर आणि जास्त धोका असलेल्या वातावरणात मानवी हस्तक्षेप न करता मोहिमा पार पाडण्यासाठी हे यंत्र लवकरच लष्कराच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

DRDO च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे 'लेग्ड रोबोट्स' म्हणजेच चालू शकणारे यंत्रमानव केवळ लष्करापुरते मर्यादित नाहीत. भविष्यात त्यांचा वापर आरोग्यसेवा, अंतराळ संशोधन, घरगुती सहाय्य आणि उत्पादन क्षेत्रातही होऊ शकतो. मात्र त्यासाठी अद्याप अनेक तांत्रिक अडचणी पार कराव्या लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT