facebook 
विज्ञान-तंत्र

खुशखबर! फेसबुकवरुन कमाईसाठी नवी घोषणा; जाहिरातींच्या माध्यमातून कमवा पैसे

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकने गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा केलीय, जी आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते. फेसबुकने सांगितलंय की, फेसबुकवर छोटे व्हिडीओ बनवणाऱ्यांना जाहिरातीच्या माध्यमातून कमाई करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. कंपनीने म्हटलंय की, ते या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असे व्हिडीओ बनवणाऱ्यांसाठी कमाईचा नवा रस्ता बनवण्याच्या योजनेचा विस्तार करत आहे. कोणकोणत्या पद्धतीने ही कमाई करता येईल, हे देखील कंपनीने स्पष्ट केलं आहे. 

कंपनीने म्हटलंय की फेसबुकवर व्हिडीओ बनवणाऱ्या लोकांना आता एक मिनिटापर्यंत व्हिडीओ बनवून पैसे कमावता येतील. यामध्ये कमीतकमी 30 सेकंदांपर्यंतची जाहीरात असेल. तीन मिनिट अथवा त्याहून अधिक वेळाच्या व्हिडीओसाठी 45 सेकंदाची जाहीरात दाखवली जाईल.  याआधी केवळ तीन मिनिट अथवा त्याहून अधिक वेळाच्या व्हिडीओवर लोक जाहीरातींच्या माध्यमातून कमाई करु शकत होते. यामध्ये कोणतीही जाहीरत 1 मिनिटांच्या आधी दाखवली जात नव्हती. 

हेही वाचा - खुशखबर! आता Twitter वर करा टिव-टिव आणि कमवा भरघोस पैसे; येणार हे नवीन फिचर
कशा मिळतील जाहीराती?
फेसबुकवर व्हिडीओमध्ये जाहीराती मिळवण्यासाठी आपल्या व्हिडीओजना 6,00,000 मिनिटांपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच संबंधित अकाउंटवर 5 अथवा त्याहून अधिक सक्रिय व्हिडीओ अपलोड होणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT