Electric Cars esakal
विज्ञान-तंत्र

Electric Cars : भारतातील सर्वात स्वस्त टॉप ५ इलेक्ट्रिक कार

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

सकाळ डिजिटल टीम

Electric Cars : जर तुम्हाला २०२३ मध्ये एक इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही खास महत्त्वाची माहिती आहे. कारण, आम्ही आज या ठिकाणी भारतात उपलब्ध असलेल्या ५ अशा कार संबंधी माहिती देत आहोत. ज्यात तुम्हाला कमी बजेट मध्ये कार मिळू शकते. या लिस्टमध्ये भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट ईव्ही पासून टाटाची टियागो ईव्ही सह अनेक इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. जाणून घ्या या कार संबंधी सविस्तर.

१. एमजी कॉमेट ईव्ही

या लिस्टमध्ये सर्वात छोटी बॅटरी आणि साइजची नवीन इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट आहे. यात मिळणारी बॅटरी क्षमता १७.३ केडब्ल्यूएचची आहे. या कारला एकदा चार्ज केल्यानंतर २३० किमीची रेंज मिळते. यात सिंगल मोटर सोबत एफडब्ल्यूडी लेआउट आहे. जो ४२ बीएचपीचे पॉवर आणि ११० एनएमचे टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. याची सुरुवातीची किंमत ७.९८ लाख रुपये आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त ईव्ही कार आहे.

२. टाटा टियागो ईव्ही

टाटा टियागो ईव्हीची सुरुवातीची किंमत ८.६९ लाख रुपये आहे. ही टाटाची सर्वात स्वस्त ईव्ही आहे. ही दोन बॅटरी पॅक १९.२ केडब्ल्यूएच सोबत येते. जी अनुक्रमे २५० किमी आणि ३१५ किमीच्या रेंज सोबत येते.

३. सिट्रोएन ईसी3

भारतात फ्रान्सच्या ब्रँडची पहिली ईव्ही ईसी३ आहे .ही मुख्य रूपाने टियागो ईव्हीला टक्कर देते. या ईव्हीचे मोटर ५६ बीएचपीचे पॉवर आणि १४३ एनएमचे टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. याची किंमत ११.५० लाख रुपयांपासून सुरू होते तसेच ही किंमत १२.७६ लाख रुपयांपर्यंत जाते.

४. टाटा टिगोर ईव्ही

टियागो ईव्ही नंतर टिगोर ईव्हीत २६ केडब्ल्यूएचची मोठी बॅटरी पॅक मिळते. याची मोटर ७४ बीएचपीचे पॉवर आणि १७० एनएमचे टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. टाटा टियोरा ईव्हीची किंमत १२.४९ लाख रुपये पासून सुरू होवून १३.७५ लाख रुपयांपर्यंत जाते. याची रेंज ३१५ किमी आहे.

५. टाटा नेक्सॉन ईव्ही

ही कार टाटाची सर्वात जास्त विकणारी इलेक्ट्रिक कार आहे. बाजारात या ईव्हीचा दबदबा आहे. नेक्सॉन ईव्ही प्राइम मध्ये ३०.२ केडब्ल्यूएचची बॅटरी दिली आहे. ही ३१२ किमी सोबत येते. नेक्सॉन ईव्ही प्राइम १० सेकंदात शून्य ते १०० किमी प्रति तास वेग पकडते. टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइमची किंमत १४.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. १७.१९ लाख रुपयांपर्यंत जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT