Electric scooter honda electric scooter launch soon in india 2023
Electric scooter honda electric scooter launch soon in india 2023 
विज्ञान-तंत्र

Honda लवकरच भारतात लॉंच करणार पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

सध्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतात खूप वेगाने लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करत आहेत, या संधीचा फायदा घेण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया 2023 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याचा विचार करत आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरबद्दल माहिती समोर आली आहे.

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइकसाठीच्या तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्म विकसासाठी होंडा मोटरसायकल जपान या कंपनीसोबत मिळून काम करणार आहे. कंपनी 2023 च्या सुरुवातीला आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. ही स्कूटर लाँच केल्यानंतर तीची थेट स्पर्धा ही बाजारात उपलब्ध असलेल्या Ather 450X, TVS i-Cube, Ola S1 Pro आणि Simple One शी होणार आहे.

पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Honda Activa ची इलेक्ट्रिक इरिटेशन असेल. ती विकसित करण्यासाठी कंपनी आपल्या कुशल कामगारांचा वापर करेल आणि होंडा मोटरसायकल जपानमधील अभियंत्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. नवीन टीम 'मेड फॉर इंडिया' पॉवरट्रेन, प्लॅटफॉर्म आणि इतर महत्त्वपूर्ण घटक विकसित करण्यावर काम करेल.

Honda Activa ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. होंडाच्या या स्कूटरची थेट स्पर्धा ही TVS ज्युपिटर आणि Hero Maestro Edge शी आहे. भारतीय ईव्ही बाजारपेठ आगामी काळात वेगाने वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कंपन्या देखील ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय, कंपनी नवीन Activa 7G वर देखील काम करत आहे आणि लवकरच ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT